मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Shiv Veena: 'मी आहे सोबत नेहमी'; रडणाऱ्या शिवसाठी धावून आली वीणा, अखेर 2 वर्षांनी खरं प्रेम समोर आलंच

Shiv Veena: 'मी आहे सोबत नेहमी'; रडणाऱ्या शिवसाठी धावून आली वीणा, अखेर 2 वर्षांनी खरं प्रेम समोर आलंच

शिव वीणा

शिव वीणा

अखेर दोन वर्षांनी वीण जगताप आणि शिव ठाकरे यांच्यातील प्रेम समोर आलं आहे. दोघांच्या ब्रेक अपच्या चर्चा रंगल्या होत्या मात्र शिवसाठी अखेर वीणा धावून आली आहे. पाहा तिची पोस्ट.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Minal Gurav

मुंबई, 06 डिसेंबर : बिग बॉस मराठी 2 च्या घरातील लव्ह बर्ड्स अर्थात शिव ठाकरे आणि वीणा जगताप. घरात दोघांची केमिस्ट्री चांगलीच रंगली. दोघांनी एकमेकांबद्दल असलेलं प्रेम व्यक्त केलं. दोघांनी घरात मस्त गेम खेळला. शिव सीझनचा विजेचा ठरला. घराबाहेर गेल्यानंतरही दोघांचं प्रेम कायम होतं. दोघांनी एकमेकांबरोबरचे फोटो शेअर करत नात्याची कबूली दिली होती. बिग बॉसच्या घरात तयार झालेलं शिव आणि वीणाचं नातं मात्र काही दिवसात संपुष्टात आल्याचं समोर आलं होतं. वीणानं शिवच्या नावाचा काढलेला टॅटू तिनं पुसला आणि सोशल मीडियावरील दोघांचे फोटो डिलीट केल्यानं दोघांचा ब्रेकअप झाल्याचं समोर आलं होतं. दोघांनी या विषयी बोलणं देखील टाळलं होतं. मात्र अखेर 2 वर्षांनी खरं प्रेम प्रेक्षकांसमोर आलं आहे. वीणानं स्वत: शिव वरचं प्रेम व्यक्त केलं आहे.

शिव ठाकरे सध्या हिंदी बिग बॉस 16 मध्ये खेळत आहे. मराठमोळा शिव ठाकरे हिंदी बिग बॉसमध्ये जाऊनही तितक्याच ताकदीनं खेळत आहे. तिथंही त्यानं प्रेक्षकांची मनं जिंकली. शिवचं बिग बॉस 16 चा विजेता ठरणार यावर शिक्का मोर्तब झालेला असताना अचानक घरात शिव ठाकरे ठसाठसा रडला. घरात सुरू असलेल्या वादावादीमुळे तो स्वत:ला फार एकट समजत होता. मात्र त्याच्या या एकटेपणात वीणा त्याच्यासाठी धावून आली असं म्हणावं लागेल.

हेही वाचा -  शिव आणि विणाचं आहे सिक्रेट रिलेशन; Bigg Boss विजेत्या अभिनेत्रीनं सांगितलं गुपित

बिग बॉस 16मध्ये फॅमिली विक टास्क दरम्यान घरच्याविषयी भावना व्यक्त करताना शिव बिग बॉसशी बोलताना ढसाढसा रडला. मला खूप एकट वाटत आहे असं त्यानं सांगितलं. तेव्हा बिग बॉसनं त्याला तुला कोणाशी बोलायचं आहे? वीणाशी का? असं विचारलं. तेव्हा रडणाऱ्या शिवची कळी खुलली आणि त्यानं 'आईही चालेल आणि वीनीही चालेलं', असं उत्तर दिलं. शिव आण बिग बॉसच्या संभाषणाची ही क्लिप सोशल मीडियावर सध्या चांगलीच व्हायरल होत आहे.

शिव आणि बिग बॉस यांच्यातील ही व्हिडीओ क्लिप वीणानं शेअर करत अखेर तिच्या मनातील प्रेम सर्वांसमोर व्यक्त केलं आहे. वीणानं शिवचा व्हिडीओ शेअर करत त्याला धीर दिला आहे. 'वाघ आहेस तू, हग्स. रडू नाही अजिबात मी आहे सोबत नेहमी',असं म्हणत वीणानं शिवसाठी प्रेम व्यक्त करत खूप सारे हार्ट इमोजी देखील शेअर केले आहेत.

शिव आणि वीणा या लव्ह बर्ड्सचं पुढे काय झालं असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना अनेक दिवस सतावत होता. दोघांची ही क्यूट जोडी चाहत्यांना प्रचंड आवडत होती. पण त्यांच्यात अचानक निर्माण झालेल्या दुराव्यामुळे चाहते देखील नाराज झाले होते. मात्रा वीणानं शेअर केलेल्या या पोस्टमुळे चाहत्यांना सुखद धक्का बसला आहे.

काही दिवसांआधीच बिग बॉस मराठीच्या पहिल्या सीझनची विजेती मेघा धाडे हिला शिव आणि वीणा यांच्याबद्दल विचारलं असता तिनं म्हटलं होतं की, 'शिव आणि वीणा यांच्यात एक खास नात आहे. शिव आणि वीणा यांचं नात खूप छान आहे. दोघांना जेव्हा एकमेकांची गरज असते तेव्हा ते एकमेकांसाठी हजर असतात. शिव हा टीव्हीवर दिसण्यासाठी नाती जोडणारा नाहीये'. यावरून शिव आणि वीणा यांचा ब्रेक अप झालेला नाहीये असं समोर आलं होतं आणि वीणाच्या पोस्टवरून त्यावर शिक्का मोर्तब झालाय असं म्हणायला हरकत नाहीये.

First published:

Tags: Bigg boss, Bigg boss marathi, Colors marathi, Marathi actress, Marathi news