मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /'रेशमाच्या रेघांनी, लालकाळ्या धाग्यांनी...' माधुरीसोबत जॅकलिन आणि यामीची ठसकेबाज लावणी

'रेशमाच्या रेघांनी, लालकाळ्या धाग्यांनी...' माधुरीसोबत जॅकलिन आणि यामीची ठसकेबाज लावणी

माधुरीने शेयर या व्हिडीओमध्ये  यामी गौतम आणि जॅकलिन फर्नांडिस चक्क मराठी गाण्यावर डान्स करत आहे.

माधुरीने शेयर या व्हिडीओमध्ये यामी गौतम आणि जॅकलिन फर्नांडिस चक्क मराठी गाण्यावर डान्स करत आहे.

माधुरीने शेयर या व्हिडीओमध्ये यामी गौतम आणि जॅकलिन फर्नांडिस चक्क मराठी गाण्यावर डान्स करत आहे.

मुंबई, 9 सप्टेंबर- धकधक गर्ल माधुरी दीक्षितला(Madhuri Dixit) तर आपण मराठी गाण्यावर अनेकवेळा डान्स करताना पाहतो. मात्र यावेळी माधुरीसोबत चक्क यामी गौतम (Yami Gautam) आणि जॅकलिन फर्नांडिसने (Jaquleine Fernandez) सुद्धा मराठी गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे. या तिघींनी 'रेशमाच्या रेघांनी, लालकाळ्या धाग्यांनी' या लावणीवर डान्स केला आहे. माधुरीने शेयर केलेला हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

बॉलिवूडची धकधक गर्ल म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री माधुरी दीक्षित नेहमीच आपल्या नृत्याने सर्वांनाच वेड लावते. वयाच्या पन्नाशीतही माधुरी दीक्षित अतिशय सुंदर आणि तितकीच ऍक्टिव्हसुद्धा आहे. माधुरी सतत आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर आपले फोटो आणि डान्सचे व्हिडीओ शेयर करत असते. नुकताच माधुरीने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक सुंदर डान्सचा व्हिडीओ शेयर केला आहे.

(हे वाच: फिल्मफेअरसाठी सोनाक्षीचं नवं फोटोशूट; पाहा अभिनेत्रीचा किलर LOOK)

या व्हिडीओमध्ये अभिनेत्री माधुरी दीक्षित यामी गौतम आणि जॅकलिन फर्नांडिससोबत चक्क मराठी गाण्यावर डान्स करत आहे. मराठीतील प्रसिद्ध लावणी 'रेश्माच्या रेघांनी, लालकाळ्या धाग्यांनी.... हात नका लावू माझ्या साडीला' या गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसून येत आहेत. या तिघीही एखाद्या अप्सरेसारख्या भासत आहेत. बॉलिवूडमधील या तिन्ही अप्सरांनी साडी परिधान केली आहे. साडीमध्ये त्या खूपच उठून दिसत आहेत.

(हे वाचा:टपू - बबिताच्या अफेयरच्या बातमीनंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस)

हा डान्स व्हिडीओ 'डान्स दिवाने'च्या सेटवरील आहे. आपल्या 'भूत पुलिस' या चित्रपटाच्या निमित्ताने यामी आणि जॅकलिन डान्स दिवानेच्या सेटवर आले होते. यावेळी त्यांनी माधुरीसोबत डान्स करण्याची संधी अजिबात नाही सोडली. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. चाहते या व्हिडीओला मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्स करत आहेत.

First published:

Tags: Bollywood News, Jacqueline fernandez, Madhuri dixit