मुंबई 9 सप्टेंबर : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Tarak Mehta Ka Ooltah Chashmah) मालिकेतील बबिता फेम अभिनेत्री मुनमुन दत्ता (Munmun Dutta) आणि टपू म्हणजेच अभिनेता राज अंदकत (Raj Andakat) यांच्या अफेयर ची बातमी समोर आल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. तर त्यासोबतच सोशल मीडियावर मीम्स चा पाऊस पडताना दिसत आहे. तर या बातमीनंतर अनेकांना मालिकेतील जेठालालची आठवण होत आहे. अनेक मजेशीर व्हिडिओ आणि जोक्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. काहींनी हा जेठालालचा अपमान असल्याचं म्हटलं तर कोणी आता जेठालालच काय होणार असं म्हणलं. (Tapu - Babita Affair)
Everybody is concerned about #Jethalal but meanwhile #Bhide to Sonu after she broke out the news that #Tapu is dating #Babitaji:#TaarakMehtakaooltahChashmah#TMKOC #RajAnadkat #MunmunDutta#AtmaramTukaramBhide pic.twitter.com/M9FyV9oI7x
— Soham Naskar (@SohamNaskar) September 9, 2021
मालिकेतील अनेक दृश्य आणि फोटोज् व्हायरल होत आहे. दरम्यान राज अंदकत मुनमुन दत्ता यांच्या अफेयर ची बातमी अनेकांसाठी आश्चर्य चकित करणारी आहे. तसेच दोघांमध्ये तब्बल 9 वर्षाचं अंतर देखील आहे.
इ टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार अनेक दिवसांपासून हे अफेयर सुरू आहे. तर मालिकेच्या सेटवरील सर्वांना याची कल्पना आहे. इतकचं नाही तर त्या दोघांनी या रिलेशन शिपचा जवळच्या व्यक्ती समोर स्वीकार केला आहे. दोघांच्या कुटुंबियांना देखील या गोष्टीची कल्पना आहे.
Perfect song for this situation #MunmunDutta #RajAnadkat #TMKOC pic.twitter.com/0FPpeq97CX
— R Δ H U L ॐ (@Simplifydude) September 9, 2021
दरम्यान मालिकेत जेठालाल हा बबिता यांच्याशी नेहमीच गोड संवाद साधताना दिसतो. तसेच बबिता साठी जेठा लाल च्या मनात सॉफ्ट कॉर्नर असल्याचं पाहायला मिळतं. मालिकेतील प्रत्येक पत्राने प्रेक्षकांच्या मनावर गारूड केलं आहे. आणि त्यामुळेच या बातमीनंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पाहायला मिळत आहे.