बॉलिवूडची दबंग गर्ल म्हणून अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाला ओळखलं जातं. सोनाक्षी आपल्या बिनधास्त अंदाजाने सर्वांना घायाळ करत असते. नुकताच अभिनेत्रीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एकापेक्षा एक फोटो शेयर करत सर्वांचं लक्ष वेधलं आहे. सोनाक्षीने हे खास फोटोशूट फिल्मफेअर मॅगझीनसाठी केलं आहे. यामध्ये सोनाक्षीने विविध गेटअपमध्ये किलर पोझ दिल्या आहेत. सोनाक्षी सिन्हाने या वेस्टर्न लूकमध्ये सर्वांनाचं घायाळ केलं आहे. सोनाक्षीचे हे फोटो चाहत्यांना मोठ्या प्रमणात पसंत पडत आहेत. सोनाक्षीने अलीकडेच वजन कमी केलं होत. आपल्या ट्रान्सफॉर्मेशनने अभिनेत्रीने सर्वांनाचं सुखद धक्का दिला होता. वजन कमी केल्यानंतर सोनाक्षी सिन्हा अधिकच फिट आणि सुंदर दिसत आहे. चाहते तिच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.