हुगो खानड्रियानी (Hugo Khandriani) असं तिच्या कुत्र्याचं नाव आहे. जॉर्जिया हूगोला घेऊण नेहमीच मंबईच्या रस्त्यांवर फिरताना दिसत असते. तब्बल पाच महिन्यानंतर जॉर्जिया भारतात परतली आहे. तेव्हा एअरपोर्टवरील सगळी कॉरन्टाइन प्रोसेस (Quarantine process) पूर्ण केल्यानंतर ती मुंबईत आपल्या राहत्या घरी परतली तेव्हा तिचा पाळलेल्या कुत्रा तिला पाहून तिच्यावर हल्ला करू लागला. हे वाचा - मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरने Engagement केली? अभिनेत्रीने शेअर केला PHOTO आता हा हल्ला म्हणजे आक्रमक हल्ला नाही. तर प्रेमाने केलेला हल्ला होता. जॉर्जियाला इतक्या दिवसांनी पाहून तिच्या कुत्र्याला आनंद अनावर झाला आणि तिच्यावर असा हल्ला करत त्याने जणू इतके दिवस आपल्यापासून दूर असणाऱ्या जॉर्जियाबाबत राग व्यक्त केला आणि ती पुन्हा भेटल्याचा आनंदही. अनेक दिवसांनी जॉर्जियाला पाहिल्यानंतर त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. हे वाचा - कंगनाची बहिण रंगोली करतेय शेती, PHOTO सोशल मीडियावर व्हायरल जॉर्जिया लवकच एका नव्या चित्रपटात दिसणार आहे. 'वेलकम टू बजरंगपूर' (welcome to bajrangpur) असं या चित्रपटाचं नाव असून अभिनेता श्रेयस तळपदेसोबत (Shreyas Talpade) ती दिसणार आहे.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood News, Dog, Entertainment