मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

कंगनाची बहिण रंगोली करतेय शेती, PHOTO सोशल मीडियावर व्हायरल

कंगनाची बहिण रंगोली करतेय शेती, PHOTO सोशल मीडियावर व्हायरल

कंगनाची बहिण रंगोली चंडेल आपल्या शेतात काम करत असून तिच्यासोबत तिचा लहान मुलगा पृथ्वी देखील आहे, रंगोलीच्या सासरचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

  मुंबई, 13 एप्रिल : बॉलिवूड (Bollywood actress) अभिनेत्री कंगना रणौतने (Kangana Ranaut)  यावेळी बहिण रंगोली चंडेलचे (Rangoli Chandel)  फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती आपल्या शेतात काम करताना दिसतेय. विविध कारणांसाठी सतत चर्चेत राहणारी कंगना नेहमीच तिच्या ट्विटर (twitter) हॅन्डल वरून निरनिराळ्या विषयांवर ट्विट करत भाष्य करत असते. कंगनाची बहिण रंगोली चंडेल ही आपल्या शेतात काम करत आहे. तिच्यासोबत तिचा लहान मुलगा पृथ्वी देखील आहे, रंगोलीच्या सासरचे हे फोटो आहेत. शेतात ती धान्य पिकाची कापणी करत आहे. फोटो पोस्ट करत कंगनाने, फोटोंना कॅप्शन देखील दिलं आहे. “रंगोली आणि पृथ्वीचे तिच्या सासरचे हे फोटो पाहून फार आनंद झाला. लहानपणी मला देखील शेतात आईसोबत काम करायला फार आवडायचं. मला आनंद होत आहे की पृथ्वी देखील हे शिकत आहे. पृथ्वी समजतो आहे, की अन्न हे सुपरमार्केटमध्ये नाही, तर धरती मातेच्या पोटात उगतं”. ट्विटरवरून कंगना सोबत तिची बहीण रंगोली देखील ट्विट करत असते. कंगनाच्या प्रत्येक गोष्टीत तिला ठामपणे साथ देत असते. रंगोली सध्या गावी हिमाचलमध्ये आपल्या कुटंबियांसोबत वेळ घालवत आहे. तर शेतात तिच्यासोबत तिचे घरातील इतर सदस्य देखील दिसत आहेत.

  (वाचा - 'जेव्हा मला ब्रा साइज विचारली जाते' Body Shaming वर अभिनेत्रीनं दिलं असं उत्तर की...)

  कंगना सध्या तिच्या आगामी चित्रपटांमध्ये व्यस्त आहे. काही दिवसांपूर्वीच तिचा बहूप्रतिक्षित चित्रपट ‘थलायवी’चा (Thalaivi)  ट्रेलर प्रदर्शित झाला होता. प्रेक्षक चित्रपटाची आवर्जून वाट पाहत होते पण महाराष्ट्रात झालेल्या लॉकडाउनमुळे थलायवीसह अन्य चित्रपटांच प्रदर्शन रद्द करण्यात आलं. अद्याप पुढील तारीख जाहीर करण्यात आली नाही. याशिवाय ‘तेजस’ (Tejas) या आगीमी चित्रपटात देखील कंगना दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच कंगनाने या चित्रपटाचं चित्रिकरण पूर्ण केलं आहे.
  Published by:News Digital
  First published:

  Tags: Bollywood News, Entertainment

  पुढील बातम्या