अर्जुन आणि मलायका त्यांनी उघडपणे आपलं नातं मान्य केलं आहे. ते सतत विविध पार्ट्यांमध्ये तसंच ट्रिप्सवर एकत्र स्पॉट होतात. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांना त्यांच्या लग्नाची उत्सुकता लागली आहे. मलायकाने आता अंगठी घालून फोटो शेअर केल्याने चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे. हे वाचा - कंगनाची बहिण रंगोली करतेय शेती, PHOTO सोशल मीडियावर व्हायरल पण मलायका किंवा अर्जुनने याबद्दल काहीच माहिती दिली नाही. तर मलायकाने एन्गेजमेंट रिंग असं लिहून एका ब्रँडला प्रमोट केलं आहे. त्यामुळे मलायका – अर्जुनचा खरंच साखपुडा झाला का असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. मलायकाने तिच्या एकटीचाच हा फोटो पोस्ट केला आहे. त्यामध्ये अर्जुन कुठेच नाही. तेव्हा हा फक्त ब्रँड प्रमोशन फोटो असल्याचं बोललं जात आहे.View this post on Instagram
पण गेले अनेक दिवस मलायका आणि अर्जुन एकमेकांना डेट करत आहेत आणि लवकरच लग्न करणार असल्याचंही बोललं जात आहे. मलायका आणि अर्जुन यांच्या नात्यात असलेला वयाचा फरक यामुळे देखील सुरुवातीला त्यांना ट्रोल करण्यात आलं होत. मलाईका ही 47 वर्षांची आहे तर अर्जुन हा 35 वर्षांचा आहे. हे वाचा - आई काजोलच्या गाण्यावर लेक न्यासाचे ठुमके; व्हायरल होतोय DANCE VIDEO मलायका ही तिच्या फिटनेसमुळे सोशल मीडियावर फारच अॅक्टिव्ह असते. तिचे अनेक फिटनेस व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. ती योग आणि जिम असे दोन्ही प्रकारचे व्यायाम करते. त्यामुळे मलाईका अतिशय फिट आहे.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Arjun kapoor, Bollywood actress, Bollywood News, Entertainment, Malaika arora