मुंबई, 08 मार्च: सध्या सोशल मीडिया असो वा टेलिव्हिजन एकाच मालिकेची प्रचंड चर्चा आहे आणि ती मालिका म्हणजे आई कुठे काय करते . मालिकेत आई अरुंधतीचं दुसरं लग्न मुलांसहित सासू सासऱ्यांनी धुमधडाक्यात लावून दिलं. अरुंधतीच्या दुसऱ्या लग्नातही तिच्या कुटुंबीयांचा उत्साह पाहून सगळ्यांचंच लक्ष वेधलं. मालिकेचं कथानक सध्या अरुंधतीच्या लग्नाभोवती फिरत आहे. अरुंधती आणि आशुतोष यांचं लग्न ठरल्या दिवसापासून दोघांच्या लग्नात काही ना काही विघ्न येत आहेत. पण आता सगळ्या संकटांवर मात करत अरुंधतीचं लग्न अखेर लागलं आहे. आता मालिकेच्या पुढच्या भागाची अपडेट समोर आली आहे. आई कुठे काय करते मालिकेत गेल्या काही दिवसांपासून अरुंधतीच्या लग्नाचे कार्यक्रम पाहायला मिळत आहेत. मेहंदी, हळद अशा सगळ्या विधी धुमधडाक्यात पार पडल्या. घरातल्या सगळ्यांनीच त्यात आनंदाने सहभाग नोंदवला मात्र कांचन तिच्या लग्नामुळे नाराज होती. पण शेवटी अरुंधतीचं कन्यादान करताना कांचनने अप्पाना साथ दिली. आता अरुंधतीला देशमुख कुटुंबीयांचा निरोप घेण्याची वेळ आली आहे. येणाऱ्या भागात अरुंधतीची देशमुखांच्या घरातून पाठवणी होणार आहे. Prasad Oak: पत्नी नव्हे तर ‘ती’च्यासाठी प्रसाद वेडा; हौस पुरी करण्यासाठी रेल्वेचा अख्खा डब्बाचं केला बुक समोर आलेल्या प्रोमोप्रमाणे अरुंधतीची पाठवणी करताना सगळेच भावुक होतात. ईशा, यश आणि अभि देखील आईचा निरोप घेताना गहिवरतात. पाठवणी वेळी अप्पा दोघांना म्हणतात कि, ‘आज लेकीची पाठवणी करतोय पण या घराचे दरवाजे तिच्यासाठी आणि तुमच्यासाठी कायमचे उघडे असतील. तिला सांभाळा असं म्हणून अप्पा आशुतोष समोर हात जोडतात. तर कांचनही म्हणते कि, ‘आज अरुंधती या घरातून जातेय, पण या घरातील तिचं स्थान दुसरं कोणीच घेऊ शकत नाही.’ असं म्हणून सगळेच साश्रू नयनांनी अरुंधतीला निरोप देतात.
मालिकेत 13 मार्चला अरुंधती आणि आशुतोषच्या लग्नाचा खास एपिसोड पाहायला मिळणार आहे. आता लग्नानंतर अरुंधती नवं आयुष्य सुरु करणार आहे. हे तिचं आयुष्य कसं असेल, तिच्या आयुष्यात सुख येणार कि अजून काही संकटांचा सामना तिला करावा लागणार हे पाहणं महत्वाचं आहे.
आई कुठे काय करते या मालिकेनं गेल्या काही दिवसांपासून टीआरपीमध्येही पहिल्या क्रमांकावर आपलं स्थान टिकवून ठेवलं आहे. अरुंधतीच्या लग्नसोहळ्यामुळे मालिकेने प्रेक्षकांना खिळवून ठेवलं आहे. या आठवड्यात मालिकेचा टीआरपी ६.५ इतका होता. आता येणाऱ्या काळात मालिकेत काय घडणार हे पाहण्याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे.