मुंबई, 10 मार्च: मराठी चित्रपटसृष्टीतील गुणी अभिनेता म्हणजे प्रसाद ओक . अभिनय, दिग्दर्शन, लेखन, निर्माता अशा सगळ्या पातळ्यांवर तो सध्या जोरात काम करतोय. गेलं अक्खं वर्ष प्रसादच्या चित्रपटांनी गाजवलं मग ते त्याने अभिनित केलेला धर्मवीर असो व दिग्दर्शित केलेला चंद्रमुखी असो. प्रसाद कायम चर्चेत असतो. येणाऱ्या वर्षात देखील तो आपल्या प्रेक्षकांसाठी दर्जेदार कलाकृती घेऊन येणार आहे. पण त्याआधी सध्या तो वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. प्रसादने पत्नीसाठी नाही तर एका खास व्यक्तीसाठी मोठी हौस केली आहे. त्याच्या पत्नीनेच याविषयी माहिती दिली असून यादोघांनी केलेली ही कामगिरी सध्या चर्चेचा विषय ठरते आहे. प्रसाद सोशल मीडियावर कायम सक्रिय असतो. तो बायकोसोबतं भन्नाट रील्स शेअर करताना दिसतो. त्याच्या रील्स चाहत्यांमध्ये चांगल्याच लोकप्रिय असतात. शिवाय यामध्ये त्याची बायको मंजिरी देखील त्याला साथ देताना दिसते. आता मात्र या दोघांनी मिळून वेगळीच भन्नाट गोष्ट केली आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत याविषयी माहिती दिली आहे. या दोघांनी यांची पेट म्हणजेच मस्काराला चक्क कोकणची सैर घडवून आणली आहे. पण तीही साधीसुधी नाही तर तिच्यासाठी या जोडप्यानं चक्क अक्खा रेल्वेचा डबाच बुक केला होता. विवाहित दिग्दर्शकामुळे प्रेग्नेंट, गर्भपातासाठी मागितले इतके लाख; बाहुबलीच्या शिवगामीवर लागलेले घाणेरडे आरोप! याविषयी सांगताना प्रसादाची बायको मंजिरीने लिहिलंय कि, मस्कारा ला घेउन कुठे तरी ट्रिप करायची होती . पण कुठे ? हया विचारात एक महिना खर्च केला . सगळे ऑप्शन्स ट्राय केले पण आपल्या देशात पेट बरोबर चे प्रवास (स्पेशली एयर ट्रैवेल ) का सोइचे नाहीत ? असो… हा वेगळा विषय आहे….म्हणून मग आम्ही जिकड़े सगळ्यांचे प्लान cancel होतात तिकड़े म्हणजे goaaaaa ठरवलं .''
ती पुढे म्हणतेय कि, ‘पण नुसतं ठरवून काय उपयोग ? जायचं कसं हा प्रश्न होताच पण ते सगळं सूखकर करायला सगळ्यात मदत झाली ती म्हणजे आपल्या @kokanrail ची काही पेपर्स ची फॉर्मॅलिटी पूर्ण करून दादर वरून रात्री कोकण एक्सप्रेस नी आम्ही निघालो. अश्या प्रवासाचा अनुभव न्हवता म्हणून अक्खा कूपे बुक केला आणि मस्कारा ला पुर्णपणे तिच्या मनासारखी ट्रिप एन्जॉय करू दिली . आणि तीनी अक्षरशः जीवाचा गोवा केला आणि तिच्यामुळे आम्ही सुद्धा खूप वर्षानी ट्रेन चा प्रवास एन्जॉय केला. कमाल एक्सपीरियन्स होता . मग पहाटे मडगाँव ला उतरुन टैक्सी केली आणि थेट नॉर्थ गोवा गाठलं . तिकडे जायच्या आधीच आम्ही पेटफ्रेंडली हॉटेल बुक केलं होतं .त्यांचाच प्रायव्हेट बीच होता .त्यामुळे मस्कारा ला मनसोक्त मज्जा करता आली आणि पर्यायानी आम्हाला पण मस्काराच्या ट्रेनर नी आम्हाला सांगितल होतं की वर्षातुन चार ट्रिप्स तुम्ही प्लान करत असाल तर त्यातली एक तरी तिच्या बरोबर करा . म्हणून अनेक गोष्टि शिकत शिकत हे सगळं धाडस केलं…’
प्रसाद आणि मंजिरीने अशा प्रकारे त्यांच्या पेटला मस्त गोवा फिरवून आणलं आहे. त्यांची ही कल्पना नेटकऱ्यांच्या चांगलीच पसंतीस उतरली असून या जोडप्याचं अनेकजण कौतुक करत आहेत.