मुंबई, 16 जानेवारी: ‘आई कुठे काय करते’ मालिका सध्या उत्कंठावर्धक वळणावर आहे. मालिकेत सध्या अरुंधतीच्या आयुष्यात खूप घडामोडी घडत आहेत. एकीकडे तिच्या लेकाचा संसार मोडत आहे पण त्याचबरोबर दुसरीकडे तिच्या आशुतोष आणि तिच्यात असलेलं अंतर दिवसेंदिवस कमी होत असून दोघांमध्ये जवळीक वाढत आहे. अशातच मात्र आता अनुष्काला या दोघांच्या नात्याबद्दल सत्य समजल्याने मालिकेला वेगळं वळण लागलं आहे. अनिरुद्धने अरुंधती आणि आशुतोष लग्न करणार असल्याचं सांगत तिला धक्का दिला आहे. त्यामुळे आता मालिकेत पुढे नेमकं काय घडणार ही उत्सुकता प्रेक्षकांना आहे. सध्या मालिकेत खरतर सध्या मालिकेत गायनाची स्पर्धा चालू आहे. या स्पर्धेत अरुंधती आणि अनुष्का मध्ये गाण्याची जुगलबंदी पाहायला मिळाली. तसेच अनुष्का जरी अरुंधतीची मैत्रीण असली तरी तिला आता या दोघांविषयीचं सत्य समजलं आहे. त्यामुळे तीचा अरुंधतीवर राग आहे. त्यामुळे अनुष्का पुरस्कार न स्वीकारताच स्टेजवरून निघून जाते. आता अनुष्का मालिकेत कोणतं नवं वादळ आणते हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. त्यातच मालिकेचा नवीन प्रोमो समोर आला आहे. सिरीयल जत्राने पोस्ट केलेल्या या प्रोमोमध्ये आशुतोष आणि अरुंधतीसमोर एक नवं आव्हान उभं राहणार असं दिसत आहे. हेही वाचा - Mamta Mohandas: आधी कॅन्सरवर मात केली अन् आता पुन्हा गंभीर आजाराशी झुंज देतेय ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री प्रोमोनुसार स्पर्धेत अरुंधती आणि अनुष्का दोघीही स्पर्धा जिंकल्या आहेत. त्यामुळे त्यांची मुलाखत घेण्यासाठी काही पत्रकार आलेले असतात. पण अरुंधती एकटी मुलाखत द्यायला नकार देते. ती म्हणते, ‘आम्ही दोघीही स्पर्धा जिंकलो आहोत. मग मुलाखत द्यायला अनुष्का सुद्धा सोबत असायला हवी. पण अनुष्का मात्र कुठे गेलीये याची कुणालाच कल्पना नसते. तेवढ्यात अनिरुद्ध मध्येच म्हणतो, ‘पण अनुष्का अशी का निघून गेली, काही झालंय का?’ त्याच्या या बोलण्याने आगळेच चिंतेत पडतात. मालिकेत आता अनुष्काच्या रागामुळे मालिकेला कोणतं वळण येणार ते पाहणं महत्वाचं आहे.
अनुष्का नक्की कुठे गेलीये, सत्य समजल्यावर ती कोणतं पाऊल उचलणार, अनुष्का अरुंधती आणि आशुतोषच्या आयुष्यातून कायमची निघून जाणार कि मालिकेत पुन्हा काही ट्विस्ट येणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
एकीकडे अरुंधती आणि आशुतोष मनाने एकत्र येत असताना दुसरीकडे मात्र अनुष्का त्यांच्यातील व्हिलन ठरणार का, ती नेमकं काय करणार हे पाहणं महत्वाचं आहे.