मुंबई, 14 जानेवारी: ‘आई कुठे काय करते’ मालिका सध्या उत्कंठावर्धक वळणावर आहे. मालिकेत सध्या अरुंधतीच्या आयुष्यात खूप घडामोडी घडत आहेत. एकीकडे तिच्या लेकाचा संसार मोडत आहे पण त्याचबरोबर दुसरीकडे तिच्या आशुतोष आणि तिच्यात असलेलं अंतर दिवसेंदिवस कमी होत असून दोघांमध्ये जवळीक वाढत आहे. अशातच मात्र आता अनुष्काला या दोघांच्या नात्याबद्दल सत्य समजल्याने मालिकेला वेगळं वळण लागलं आहे. अनिरुद्धने अरुंधती आणि आशुतोष लग्न करणार असल्याचं सांगत तिला धक्का दिला आहे. त्यामुळे आता मालिकेत पुढे नेमकं काय घडणार ही उत्सुकता प्रेक्षकांना आहे. सध्या मालिकेत खरतर सध्या मालिकेत गायनाची स्पर्धा चालू आहे. त्यात अरुंधतीने देखील सहभाग घेतला आहे. तर आशुतोष या स्पर्धेचं परीक्षण करत आहे. मात्र आता या स्पर्धेत अरुंधती आणि अनुष्का मध्ये गाण्याची जुगलबंदी पाहायला मिळणार आहे. अनुष्का जरी अरुंधतीची मैत्रीण असली तरी तिला आता या दोघांविषयीचं सत्य समजलं आहे. त्यामुळे तीचा अरुंधतीवर राग आहे. त्यामुळे आता अनुष्का मालिकेत कोणतं नवं वादळ आणते हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. त्यातच मालिकेचा नवीन प्रोमो समोर आला आहे. सिरीयल जत्राने पोस्ट केलेल्या या प्रोमोमध्ये आशुतोष आणि अरुंधतीसमोर एक नवं आव्हान उभं राहणार असं दिसत आहे. हेही वाचा - Priya Marathe: प्रिया मराठेच्या मनमोहक फोटोंवर चाहत्याची भन्नाट कमेंट; म्हणाला ’ मला तुझे वेड….' प्रोमोनुसार स्पर्धेत अरुंधती आणि अनुष्का दोघीही खूप छान गातात. अनुष्काचं गाणं ऐकून सगळेच आनंदी होतात पण अरुंधतीच्या गाण्याने मंत्रमुग्ध होतात. आशुतोष कोणा एकीला नाही तर दोघीनाही विजेता घोषित करतो. यामुळे अरुंधतीला आनंद होतो पण अनुष्का मात्र दुखावली जाते.आशुतोषकडून पुरस्कार न स्वीकारताच अनुष्का भर स्टेजवरून निघून जाते. तिच्या या कृतीमुळे सगळ्यांनाच धक्का बसतो. मालिकेत आता अनुष्काच्या रागामुळे मालिकेला कोणतं वळण येणार ते पाहणं महत्वाचं आहे.
मध्यंतरी अनुष्काने आशुतोष वरील प्रेमाची कबुली दिली होती. एवढंच नाही तर ती पुन्हा मुंबईत देखील आशुतोष मुळेच आली होती. तर आशुने देखील ‘मला तू आवडतेस’ अशी कबुली दिली होती. पण त्याचं प्रेम मात्र अरुंधतीवरच आहे हे आजपर्यंत स्पष्ट झालंच आहे. पण आता अनुष्कामुळे या दोघांच्या नात्याला पुन्हा वेगळं वळण येणार आहे.
एकीकडे अरुंधती आणि आशुतोष मनाने एकत्र येत असताना दुसरीकडे मात्र अनुष्का त्यांच्यातील व्हिलन ठरणार का, ती नेमकं काय करणार हे पाहणं महत्वाचं आहे.