जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Mamta Mohandas: आधी कॅन्सरवर मात केली अन् आता पुन्हा गंभीर आजाराशी झुंज देतेय 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री

Mamta Mohandas: आधी कॅन्सरवर मात केली अन् आता पुन्हा गंभीर आजाराशी झुंज देतेय 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री

ममता मोहनदास

ममता मोहनदास

प्रसिद्ध अभिनेत्रीने कर्करोगावर मात केल्यानंतर आता गंभीर आजार झाल्याचा खुलासा केला आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 15 जानेवारी: प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री ममता मोहनदास चांगलीच चर्चेत असते. मध्यंतरी हा अभिनेत्री कर्करोगाशी झुंज देत होती. त्यातून सावरलीच होती तर आता आता एका गंभीर आजाराशी ममता लढत आहे. अभिनेत्री ममता मोहनदासने तिच्या प्रकृतीबद्दल धक्कादायक माहिती दिली आहे. तिने रविवारी तिचे काही सेल्फी शेअर करत चाहत्यांना तिच्या आजाराबद्दल सांगितलं. या फोटोंमध्ये तिच्या चेहऱ्याचा रंग बदललेला दिसत आहे. हे पाहून तिच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला आहे. शेअर केलेल्या फोटोंमध्ये ममता मोहनदास बाहेर बसलेली दिसत आहे. तिच्या हातात एक कप आहे. तिने काळ्या रंगाचा टी-शर्ट, टाइट्स आणि जॅकेट घातलं आहे. या फोटोंबरोबर तिने एक मोठं कॅप्शन दिलंय. ‘‘प्रिय सूर्या, मी आता तुला मिठी मारते, जशी मी यापूर्वी कधीच मारली नाही. चेहऱ्यावर बरेच डाग आहेत, मी माझा रंग गमावत आहे. मी सकाळी तुझ्या आधी उठते. धुक्यातून तुझे पहिले किरण निघताना पाहण्यासाठी. तुझ्याकडे जे काही आहे ते मला दे… मी तुझी ऋणी आहे. आजपासून कायमची,’’ असं कॅप्शन ममताने दिलंय. हेही वाचा - HBD Sidharth Malhotra: कियारा आधी ‘या’ अभिनेत्रींसोबत जोडलं गेलंय सिद्धार्थ मल्होत्राचं नाव; वाचून वाटेल आश्चर्य यासोबतच ममता मोहनदास यांनी रंग, ऑटोइम्यून रोग, त्वचारोग आणि सूर्यप्रकाश यांसारखे हॅशटॅगही वापरले आहेत. अभिनेत्रीच्या या पोस्टवर केवळ चाहतेच नाही तर स्टार्सही कमेंट करत आहेत आणि तिला या आजाराशी लढण्यासाठी धीर देत आहेत. एकाने लिहिले, ‘तुम्ही खरोखरच खूप शक्तिशाली महिला आहात, आम्हा सर्वांना अशीच प्रेरणा देत राहा’, तर दुसऱ्याने लिहिले, ‘तू लढाऊ आहात आणि यातून तू लवकरच बरी होशील.’ त्याचवेळी दुसऱ्याने लिहिले की, ‘तुझ्यामुळे लाखो महिलांना प्रेरणा मिळेल.’

जाहिरात

ममता मोहनदासने कर्करोगावर मात केली आहे. काही वर्षांपूर्वी तिला कर्करोग असल्याचे निदान झाले होते. त्यानंतर तिने अमेरिकेत उपचार घेतले. 2014 मध्ये एका मुलाखतीदरम्यान, कॅन्सरबद्दल बोलताना अभिनेत्री म्हणाली होती, ‘मी असं म्हणू शकत नाही की मी या आजारापूर्वी जितकी मजबूत होते, तितकी आज आहे.’

News18लोकमत
News18लोकमत

‘आधी मी कशाचीही चिंता करायचे नाही. कोणतीही समस्या असली तरी मी घाबरायचे नाही. पण आयुष्यात पहिल्यांदाच मी घाबरले. सकारात्मक राहा, हे सांगणं सोपं आहे. पण आत्ता मला वाटतं की घाबरलेलं असायला काहीच हरकत नाही,’ असं ममता म्हणाली होती. ममता एक मल्याळम अभिनेत्री असून चाहते तिला आता धीर देत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात