मुंबई, 04 फेब्रुवारी : लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते ’ पुन्हा एकदा छोट्या पडद्यावरील सर्वाधिक आवडती मालिका बनली आहे. मालिकेची कथा आणि कलाकार यामुळे ही मालिका प्रेक्षकांची लाडकी आहे. आता पुन्हा एकदा मालिकेत मोठा ट्विस्ट आला आहे. अरुंधती आणि आशुतोष यांच्या लग्नात पुन्हा एक विघ्न येणार आहे. मालिकेत दाखवण्यात येणाऱ्या कथानकानुसार, आता अरुंधती आणि आशुतोष यांच्या लग्नाला आप्पांनी होकार दिला आहे. मात्र घरातील काही सदस्य त्यांच्या विरोधात असल्याने त्याचा फटका अरुंधतीला बसताना दिसत आहे. अरुंधतीच्या लग्नाला कांचन विरोध करत आहेत मात्र त्याचा धसका आप्पा घेणार आहेत. अरुंधतीने अखेर काहीही झालं तरी आशुतोष सोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. पण तिला देशमुख कुटुंबाचा विरोध आहे. फक्त अप्पा आणि यश आणि अनघा अरुंधतीच्या पाठीशी ठामपणे उभे असून बाकी सगळ्यांचा तिच्या लग्नाला विरोध आहे. कांचनला देखील अरुंधतीने दुसरं लग्न करणं मान्य नाही. अशातच अरुंधतीने सगळ्यांच्या विरोधात जाऊन खंबीर उभी राहणार आहे. आता तिने सगळ्यांच्या विरोधात जाऊन घर सोडलं आहे. तर कांचनने अरुंधतीने लग्न केलं तर तिला पुन्हा देशमुख कुटुंबियांच्या घरात स्थान नाही असा निर्णय सुनावला आहे.त्यातच आता अरुंधतीच्या लग्नाबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे. हेही वाचा - Milind Gawali : अनिरुद्धच्या पात्राला कंटाळले मिलिंद गवळी? म्हणाले ‘हल्ली तो खूपच डोक्यात जातो…’ अरुंधतीला अगदी साधेपणानं घरच्याघरी लग्न करायचंय तर आशुतोषचं पाहिलंच लग्न असल्याने त्याला ते धुमधडाक्यात करण्याची इच्छा आहे. मालकेचा एक नवीन प्रोमो समोर आला आहे. त्यानुसार आशुतोषच्या लग्नाबद्दल त्याचा मित्र त्याला चिडवत असतो. पण आशुतोष साधेपणानं लग्न करायचं असं त्याला सांगतो. तर दुसरीकडे अनुष्का देखील अरुंधतीला समजवताना दिसत आहे. ती म्हणतीये, तू आता आशुतोषच्या मनाचा देखील विचार करायला हवास’. त्यामुळे आता अरुंधतीचं लग्न साधेपणानं होणार कि धुमधडाक्यात हे पाहणं महत्वाचं आहे.
पण त्याआधी तिच्या लग्नात पुन्हा विघ्न येण्याची शक्यता आहे. कारण अप्पा लग्नाची तारीख काढायला गेलेले असतात. पण त्यातही ते म्हणतात कि एक मोठा प्रॉब्लेम झाला आहे.’ आता तो प्रॉब्लेम नक्की काय हे बघणं महत्वाचं आहे.
‘आई कुठे काय करते’ ही मालिका दिवसेंदिवस प्रेक्षकांना खिळवून ठेवत आहे. या मालिकेत सतत नवनवीन ट्विस्ट समोर येत आहेत.ही मालिका आई अर्थातच अरुंधतीभोवती फिरत असली तरी मालिकेतील प्रत्येक पात्र तितकीच महत्वाची आहे. मालिकेत सतत विविध घटना घडत असतात. सध्या मालिका फारच उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचली आहे. मालिकेत अरुंधती आणि अनुष्का अखेर एकत्र आले आहेत. दोघांनी एकमेकांच्या मनातील भावना सांगत लग्नाचा निर्णय घेतला आहे.