मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Aai Kuthe Kay Karte: अरुंधतीनं लग्नाचा निर्णय सांगताच बावचळला अनिरुद्ध; खेळणार 'हा' नवा डाव

Aai Kuthe Kay Karte: अरुंधतीनं लग्नाचा निर्णय सांगताच बावचळला अनिरुद्ध; खेळणार 'हा' नवा डाव

आई कुठे काय करते

आई कुठे काय करते

. मालिकेत अरुंधती आणि अनुष्का अखेर एकत्र आले आहेत. दोघांनी एकमेकांच्या मनातील भावना सांगत लग्नाचा निर्णय घेतला आहे. पण अनिरुद्धच्या रूपाने मालिकेत पुन्हा नवा ट्विस्ट येण्याची शक्यता आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 02 फेब्रुवारी : 'आई कुठे काय करते' ही मालिका दिवसेंदिवस प्रेक्षकांना खिळवून ठेवत आहे. या मालिकेत सतत नवनवीन ट्विस्ट समोर येत आहेत.ही मालिका आई अर्थातच अरुंधतीभोवती फिरत असली तरी मालिकेतील प्रत्येक पात्र तितकीच महत्वाची आहे. मालिकेत सतत विविध घटना घडत असतात. सध्या मालिका फारच उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचली आहे. मालिकेत अरुंधती आणि अनुष्का अखेर एकत्र आले आहेत.  दोघांनी एकमेकांच्या मनातील भावना सांगत लग्नाचा निर्णय घेतला आहे. पण अनिरुद्धच्या रूपाने मालिकेत पुन्हा नवा ट्विस्ट येण्याची शक्यता आहे.

अरुंधतीने अखेर काहीही झालं तरी आशुतोष सोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. पण तिला देशमुख कुटुंबाचा विरोध आहे. फक्त अप्पा आणि यश आणि अनघा अरुंधतीच्या पाठीशी ठामपणे उभे असून बाकी सगळ्यांचा तिच्या लग्नाला विरोध आहे. कांचनला देखील अरुंधतीने दुसरं लग्न करणं मान्य नाही. अशातच अरुंधतीने सगळ्यांच्या विरोधात जाऊन खंबीर उभी राहणार आहे.

सिरीयल जत्राने मालिकेचा नवीन प्रोमो पोस्ट केला आहे. त्यानुसार, अरुंधती कांचन, अनिरुद्ध आणि अभिला म्हणते, 'माझा निर्णय झालाय. काहीही झालं तरी मी आशुतोषही लग्न करणार.' हे ऐकून अनिरुद्ध चांगलाच बावचळला आहे. तो तिला म्हणतो, 'अरुंधती तू दुसरं लग्न केलं तर तुला पुन्हा देशमुखांच्या घरात येता येणार नाही. आणि हा माझा निर्णय अजिबात बदलणार नाही.' अनिरुद्धने सांगितलेला हा निर्णय ऐकून घरातल्या सगळ्यांनाच धक्का बसतो. तर दुसरीकडे मात्र आशुतोष अरुंधतीची खंबीर साथ देत आहे.

अरुंधती आणि आशुतोष लग्न करतील पण इथे अनिरुद्धच दुसरं लग्नही मोडत आहे. संजना अनिरुद्धपासून कायमची दूर जात आहे. हे दोघे लवकरच घटस्फोट घेणार असल्याचंही संजना म्हणाली होती. अनिरुद्धच्या या वागण्यामुळे संजना आणि त्याच्यात आता कायमचा दुरावा येणार का ते पाहण्याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे.

अरुंधती दुसऱ्या व्यक्तीसोबत पुन्हा संसार थाटणार ही गोष्ट अनिरुद्धला मान्य होणार का? देशमुखांच्या घरातल्यांसोबतच मालिकेचे प्रेक्षक अरुंधतीच्या या निर्णयाला पाठिंबा देणार का, अरुंधती आणि आशुतोष यांचं लग्न अखेर होणार का हे पाहण्याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. एकीकडे घरात अभि आणि अनघाचं नातं तुटत असताना अरुंधती स्वतःच नवं नातं कसं  जुळवणार, तिच्या या निर्णयात घरातील सगळे तिला साथ देणार का हे पाहणं महत्वाचं आहे.

First published:

Tags: Aai Kuthe Kay Karte, Marathi entertainment, Marathi Serial