मुंबई, 21 जानेवारी: ‘ आई कुठे काय करते ’ ही मालिका दिवसेंदिवस प्रेक्षकांना खिळवून ठेवत आहे. या मालिकेत सतत नवनवीन ट्विस्ट समोर येत आहेत.ही मालिका आई अर्थातच अरुंधतीभोवती फिरत असली तरी मालिकेतील प्रत्येक पात्र तितकीच महत्वाची आहे. मालिकेत सतत विविध घटना घडत असतात. सध्या मालिका फारच उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचली आहे. मालिकेत अरुंधती आणि अनुष्का अखेर एकत्र आले आहेत. दोघांनी एकमेकांच्या मनातील भावना सांगितल्या आहेत. पण अनिरुद्धच्या रूपाने मालिकेत पुन्हा नवा ट्विस्ट येण्याची शक्यता आहे. अनिरुद्धने मुद्दामहून अनुष्काला आशुतोष आणि अरुंधतीचं एकमेकांवर प्रेम असल्याचं सांगितलं होतं. आता मात्र सगळी संकटं संपून एवढे दिवस प्रेक्षकांना ज्याची उत्सुकता होती तेच घडणार आहे. मात्र एकीकडे आशुतोष आणि अरुंधती एकत्र येताना संजना आणि अनिरुद्धचं नातं बिनसलं आहे. अनिरुद्धच्या एवढे दिवस ज्याची भीती होती तेच घडताना दिसून येत आहे. हेही वाचा - Aai Kuthe Kay Karte: अखेर मनातलं प्रेम ओठांवर आलंच; अरुंधती-आशुतोषचा फिल्मी रोमान्स, ‘त्या’ सीनची होतेय तुफान चर्चा सिरीयल जत्राने मालिकेचा नवा प्रोमो समोर पोस्ट केला आहे. त्यानुसार अरुंधती आशुतोषला लग्नासाठी होकार देऊन घरी परतली आहे. ती घरी येताच अनिरुद्ध दारातच उभा असतो. अनिरुद्ध आणि अरुंधती मध्ये बातचीत चालू आहे. अरुंधती घरी येताच तो तिला विचारतो, ‘मग कधी आहे लग्न, ठरली का तारीख’ त्यावर अरुंधती म्हणते कि, ‘मी सगळं स्वतः सांगेन तुम्हाला पण मला जेव्हा मनापासून वाटेल तेव्हा.’ एवढं बोलून ती तेथून निघून जाते. अनिरुद्धचा डाव फसला आहे. त्यामुळे तो चांगलाच बिथरला आहे. अनिरुद्ध म्हणतो, ‘मला ज्याची भीती आहे तेच तर घडत नाहीये ना.’ त्यामुळे अनिरुद्ध आता मालिकेत कोणतं वादळ आणतो का ते पाहणं महत्वाचं आहे.
अरुंधती आणि आशुतोष लग्न करतील पण इथे अनिरुद्धच दुसरं लग्नही मोडत आहे. संजना अनिरुद्धपासून कायमची दूर जात आहे. हे दोघे लवकरच घटस्फोट घेणार असल्याचंही संजना म्हणाली होती. अनिरुद्धच्या या वागण्यामुळे संजना आणि त्याच्यात आता कायमचा दुरावा येणार का ते पाहण्याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे.
अरुंधती दुसऱ्या व्यक्तीसोबत पुन्हा संसार थाटणार ही गोष्ट अनिरुद्धला मान्य होणार का? देशमुखांच्या घरातल्यांसोबतच मालिकेचे प्रेक्षक अरुंधतीच्या या निर्णयाला पाठिंबा देणार का, अरुंधती आणि आशुतोष यांचं लग्न अखेर होणार का हे पाहण्याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. एकीकडे घरात अभि आणि अनघाचं नातं तुटत असताना अरुंधती स्वतःच नवं नातं कसं जुळवणार, तिच्या या निर्णयात घरातील सगळे तिला साथ देणार का हे पाहणं महत्वाचं आहे.