मुंबई, 19 जानेवारी: लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’ पुन्हा एकदा नेटकऱ्यांमध्ये चर्चेत आहे. मालिकेची कथा पुन्हा एकदा अरुंधती आणि आशुतोष यांच्याभोवती फिरताना दिसत आहे. अरुंधतीच्या आयुष्यात सध्या बऱ्याच घडामोडी घडत आहेत. सध्या मालिकेत अभि आणि अनघाचा विषय मागे पडला असून अरुंधती आणि आशुतोष वर भर देण्यात येत आहे. नुकताच मालिकेत नवा ट्विस्ट आला होता. अनिरुद्धने मुद्दामहून अनुष्काला आशुतोष आणि अरुंधतीचं एकमेकांवर प्रेम असल्याचं सांगितलं होतं. आता मात्र सगळी संकटं संपून एवढे दिवस प्रेक्षकांना ज्याची उत्सुकता होती तेच घडणार आहे. मात्र एकीकडे आशुतोष आणि अरुंधती एकत्र येताना संजना आणि अनिरुद्धचं नातं बिनसलं आहे. सिरीयल जत्राने मालिकेचा नवा प्रोमो समोर पोस्ट केला आहे. त्यानुसार अनिरुद्ध आणि अरुंधती मध्ये बातचीत चालू आहे. अनिरुद्ध तिला म्हणतो, ‘देवाकडे जे काही मागशील ना ते नीट लक्ष देऊन विचारपूर्वक माग’ त्यावर अरुंधती म्हणते मी देवाकडे हात पसरत नाही त्याच्यासमोर हात जोडते. आणि त्याचबरोबर ती म्हणते , ‘तुम्ही अनुष्काला माझ्या आणि आशुतोषबद्दल जे काही सांगितलं त्याबद्दल तुमचे आभार.’ हेही वाचा - Priya Bapat: ‘तू आता तारा झालीस…’ प्रिया बापटने आईसाठी लिहिलेली पोस्ट तुमच्याही डोळ्यात आणेल पाणी त्यानंतर संजना तिथे येते. ती म्हणते, ‘तू जेवढं तिचा वाईट करायला जातोस तितकंच तिचं भलं होतंय. हरलास अनिरुद्ध परत हरलास’ हे ऐकून अनिरुद्धला चांगलाच राग येतो. आता अनिरुद्ध पुढे नेमकं काय पाऊल उचलणार ते बघणं महत्वाचं आहे. अनिरुद्धच्या या वागण्यामुळे संजना आणि त्याच्यात आता कायमचा दुरावा येणार का ते पाहण्याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे.
आता अरुंधती आणि आशुतोष विषयी देखील मोठी घडामोड घडणार आहे. एकीकडे अरुंधतीला यशचा पाठींबा मिळतोय तर दुसरीकडे आशुतोषला त्याची आई प्रोत्साहित करतेय. यश आणि आशुतोषची आई दोघांनाही आता तुम्ही एकमेकांना सांगून टाकायला हवं असं सांगतात. आणि दोघेही एकमेकांना फोन करतात. त्यानंतर अरुंधती आशुतोषला भेटते. त्यांना ‘मी तुमच्याशी लग्न करायला तयार आहे.’ असं सांगते. तेव्हा आशुतोष फारच आनंदी होतो.
तो म्हणतो, ‘तुला तुझ्या निर्णयाचा पश्चाताप होणार नाही याची खात्री मी तुला देतो अरुंधती.’ अखेर आता दोघांच्याही मनातील प्रेम ओठांवर आलं असून लवकरच मालिकेत या दोघांच लग्न पाहायला मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे येणारे भाग पाहण्याची उत्सुकता आता प्रेक्षकांना लागली आहे.