जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / पुण्यात तरुणींचा देहव्यापार, चित्रपटाचीही घोषणा; अखेर कल्याणी देशपांडेचा पर्दाफाश 

पुण्यात तरुणींचा देहव्यापार, चित्रपटाचीही घोषणा; अखेर कल्याणी देशपांडेचा पर्दाफाश 

पुण्यात तरुणींचा देहव्यापार, चित्रपटाचीही घोषणा; अखेर कल्याणी देशपांडेचा पर्दाफाश 

प्रत्येक वेळी जामिनावर सुटल्यानंतर कल्याणी पोलिसांच्या नाकावर टिच्चून सेक्स रॅकेट चालवत असे.

  • -MIN READ Trending Desk Pune,Maharashtra
  • Last Updated :

पुणे, 21 डिसेंबर : पुण्यातील सेक्स रॅकेट चालवणाऱ्या कल्याणी उर्फ जयश्री उर्फ टीन उमेश देशपांडे हिला सोमवारी पुण्यातील विशेष न्यायालयानं दोषी ठरवलं आहे. तिला सात वर्षांची सक्तमजुरीची (आरआय) शिक्षा ठोठावण्यात आली आहे. अनैतिक तस्करी प्रतिबंधक कायदा (पीआयटीए) तसंच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यातील (मोक्का) कलमांअंतर्गत तिला दोषी ठरवण्यात आलं आहे. या दोन्ही कायद्यांतर्गत आरोपीला दोषी ठरवण्यात आलेलं हे महाराष्ट्रातील पहिलं प्रकरण आहे. 52 वर्षांची कल्याणी पुण्यातील सर्वात कुख्यात सेक्स रॅकेटर होती.

जाहिरात

पोलीस सूत्रांनी सांगितलं की, कल्याणीच्या गुन्ह्यांची व्याप्ती ही अजय पाटील, शक्ती थापा, मंगेश रुद्राक्ष आणि राजू बंगाली यांसारख्या पुरुष सेक्स रॅकेटर्सपेक्षा जास्त होती. ती 90च्या दशकापासून पुण्यातील देह व्यापाराचा एक भाग होती, असं पोलीस अधिकाऱ्यांचं मत आहे. पण, 2000नंतर तिच्यावर पुणे शहर पोलीस विभागात विविध गुन्हे नोंदवले गेले. स्थानिक कुटुंबात जन्मलेली आणि वाढलेली कल्याणी पुण्यातील आघाडीची सेक्स रॅकेटर म्हणून कुप्रसिद्ध झाली. तिच्यावर आत्तापर्यंत सुमारे 24 गुन्हे दाखल झालेले आहेत.

हे ही वाचा :  धक्कादायक! लहान मुलाने कोल्ड्रिंक चोरल्याने प्रायव्हेट पार्टमध्ये टाकली चटणी

कल्याणी पुण्यातील सूस भागातील तिच्या बंगल्यातून ‘व्हीनस एस्कॉर्ट्स’ नावाची एस्कॉर्ट एजन्सी चालवत होती. पाषाण येथील रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, सूस रोडवरील कल्याणीचा बंगला देह व्यापार आणि संबंधित गुन्ह्यांसाठी प्रसिद्ध होता. डिसेंबर 2007 मध्ये तिचा जवळचा सहकारी अनिल ढोले याचा याच बंगल्यावर खून झाला होता. ढोले हा मुंबईहून वेश्या व्यवसायासाठी कॉल गर्ल्स आणण्यासाठी एजंट म्हणून काम करत असे. ढोले याच्या मृत्यूनंतरही कल्याणीनं आपला व्यवसाय थांबवला नाही. ती पुणे आणि इतर भागांत वेश्या व्यवसायासाठी देश-विदेशातील मुलींचा पुरवठा करत असे.

जाहिरात

डिसेंबर 2005 मध्ये पुण्याच्या हद्दीत एका हॉटेलमध्ये सेक्स वर्करच्या हत्येप्रकरणी तिचं नाव समोर आलं होतं. तेव्हा कल्याणीवर मोक्का (एमसीओसीए) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी हवेली पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला होता. पण, तिची मोक्कातून निर्दोष सुटका झाली होती.

कल्याणीनं हॉटेल व्यावसायिक आणि संघटित गुन्हेगारी जगतामध्ये आपलं मजबूत नेटवर्क विकसित केलं होतं. काही हाय-प्रोफाइल क्लायंटसह तिच्याकडे मोठा ग्राहक वर्ग होता. तिला या पूर्वी अनेक वेळा अटक करण्यात आली होती. तिच्यावर मुंबईत फौजदारी गुन्हाही दाखल होता.

जाहिरात

हे ही वाचा :   बापाच्या समोर मुलीला उचलून नेलं, जबरदस्तीने कारमध्ये बसवलं अन्…धक्कादायक Video

31 मार्च 2012 रोजी हिंजवडी पोलिसांनी देह व्यापार प्रकरणात कल्याणीला अटक केली होती. मात्र, त्यावेळी कल्याणीवर कारवाई करणारे पोलीस लाच मागितल्याप्रकरणी अटक झाले. एप्रिलमध्ये राज्य लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) हिंजवडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक बाळासाहेब सुर्वे आणि कॉन्स्टेबल मोहम्मद हनिफ अब्बास शेख यांना कल्याणीचा चुलत भाऊ जतीन चावडा याच्याकडून लाच मागितल्याप्रकरणी अटक झाली होती. कल्याणीच्या पोलीस कोठडीत वाढ न करण्यासाठी पोलिसांनी 40 हजार रुपयांची मागणी केली होती. या घटनेचा आधार घेऊन कल्याणी जामिनावर बाहेर पडण्यात यशस्वी झाली होती.

जाहिरात

प्रत्येक वेळी जामिनावर सुटल्यानंतर कल्याणी पोलिसांच्या नाकावर टिच्चून सेक्स रॅकेट चालवत असे. इंडियन एक्सप्रेसच्या पत्रकारांनी तिला काही वर्षांपूर्वी जामिनावर बाहेर असताना शिवाजीनगर परिसरातील एका नामांकित हॉटेलमध्ये आपलं काम करताना पाहिलं होतं.

पोलीस सूत्रांनी सांगितलं की, कल्याणीनं ‘इमेज बिल्डिंग’चा प्रयत्नही केला. यासाठी तिनं तिच्या जीवनावर आधारित चित्रपटाची घोषणा केली होती. या चित्रपटाचं चित्रीकरण पुणे, मुंबई आणि अहमदाबाद येथे होत असल्याचा दावाही तिने केला होता. पण, चित्रपटाचं नाव कधीच उघड झालं नाही आणि तो प्रदर्शितही झाला नाही. ‘पोलीस माझं शोषण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मला देह व्यापारात येण्यास कसं भाग पाडलं गेलं, हे चित्रपटाच्या माध्यमातून जगाला सांगायचं आहे’, असं तिचं म्हणणं होतं.

जाहिरात

एप्रिल 2012 मध्ये, डॉ. बी. आर. आंबेडकर यांच्या जयंतीपूर्वी, कल्याणीनं सामाजिक कार्याचा भाग म्हणून शहराच्या काही भागात बॅनरही लावले होते. या बॅनरवर डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेसोबत तिचाही फोटो लावला होता.

कल्याणीनं चौकशीदरम्यान पोलिसांना सांगितलं की, ती एका सामान्य कुटुंबातील महिला आहे. एका ऑटो-रिक्षा चालकाशी तिचं लग्न झालं होतं. कुटुंबासाठी पैशाची तातडीची गरज असल्यानं तिला सेक्स रॅकेट चालवण्यास भाग पाडलं गेलं.

हे ही वाचा :  घरात रात्रभर दारूची पार्टी, पण सकाळी बायकोचं नवऱ्यासोबत भयानक कृत्य

जुलै 2016 मध्ये कोथरूड येथील भुसारी कॉलनीतील अपार्टमेंटमध्ये इन्स्पेक्टर संजय निकम यांच्या नेतृत्वाखालील गुन्हे शाखेच्या पथकानं एका सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केल्यानंतर कल्याणीच्या अडचणींमध्ये वाढ झाली. पोलिसांना या ठिकाणी वेश्या व्यवसायात गुंतलेल्या उझबेकिस्तानमधील दोन मुली आणि अन्य तीन जण आढळले होते. या मुली कल्याणीसाठी काम करत होत्या. या प्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी सुरुवातीला कल्याणीचे साथीदार प्रदीप गवळी आणि रवी तपासे यांना अटक केली. ऑगस्टमध्ये तिलाही पीआयटीए कायद्याच्या कलमांखाली अटक करण्यात आली होती.

त्याच वर्षी ऑक्टोबर महिन्यामध्ये, पुण्याच्या तत्कालीन पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी संघटित सेक्स रॅकेट चालवल्याबद्दल कल्याणीविरुद्ध मोक्का लावण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. या प्रकरणाचा आता निकाल लागला असून विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी या प्रकरणी कल्याणी आणि तिच्या साथीदारांना दोषी ठरवलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात