हैदराबाद, 20 डिसेंबर : तेलंगणातील राजन्ना सिरसिल्ला जिल्ह्यात मंगळवारी एका 18 वर्षीय मुलीचे तिच्या वडिलांसमोर काही अज्ञात चोरट्यांनी अपहरण केले. सीसीटीव्हीमध्ये कैद झालेल्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ही घटना चंदुर्थी तालुक्यातील मुडेपल्ले गावची आहे.
व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, एक अज्ञात व्यक्ती चेहरा लपवत थेट तरूणीला धरत पळवून नेण्याचा प्रयत्न करत असतो यामध्ये ती तरूणी पळून जाण्याचा प्रयत्न करते, पण चोरटा तिला जबरदस्तीने गाडीत ओढतो. त्यानंतर गाडीचा दरवाजा बंद करतो. वडील त्या गाडीच्या मागे धावू लागतात पण चोरटे पळून जात असल्याचा स्पष्ट व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
#WATCH | Telangana: An 18-year-old girl was kidnapped in front of her father when they were returning to their house after visiting a temple, in the Sircilla district
— ANI (@ANI) December 20, 2022
(CCTV visuals) pic.twitter.com/GYedm9jkHJ
मंगळवारी पहाटे 5 वाजता राजन्ना सिरसिल्ला जिल्ह्यात चार लोक शालिनी म्हणून ओळखल्या जाणार्या महिलेला बळजबरीने एका कारमध्ये घेऊन निघून जात असल्याचे एका व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. या मुलीने नंतर सोशल मीडियावर एक व्हिडिओ जारी केला की, तिच्या पालकांनी जॉनी नावाच्या दलित पुरुषाशी लग्नाला विरोध केल्याने तिने हे अपहरण केले असल्याचे सांगण्यात आले.
हे ही वाचा : घरातून फरफटत ऊसाच्या शेतात नेऊन 17 वर्षीय मुलीवर बलात्कार; त्या अवस्थेत पीडितेचे काढले फोटो
या घटनेची माहिती देताना वेमुलवाडा डीएसपी नागेंद्र चारी म्हणाले की, या घटनेचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आम्ही त्यांचा शोध घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. या घटनेत चार जणांचा समावेश आहे. मागच्या काही महिन्यांपूर्वी सज्ञान असताना ही तरुणी प्रियकरासोबत पळून गेली होती.
एक वर्षापूर्वी आमचे लग्न झाले. तेव्हा मी अल्पवयीन असल्याने माझ्या आई-वडिलांनी ते मान्य केले नाही आणि माझ्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला. आता आम्ही प्रौढ झालो आहे, म्हणून आम्ही लग्न केले आहे. माझे पती दलित असल्याने ते अजूनही आक्षेप घेत आहेत, असा खुलासा त्या मुलीने व्हिडिओमध्ये केला आहे, तसेच पोलिस सुरक्षेची विनंती केली आहे.
हे ही वाचा : लव्ह मॅरेज केलं अन् त्याचं खरं रुप दिसलं, उच्चशिक्षित पत्नीसोबत पतीचं धक्कादायक कृत्य
दरम्यान तीला आता 18 वर्षे पूर्ण झाली आहेत. तो (तिचा प्रियकर) तिला घेऊन गेला असावा असा अंदाज बांधण्यात आला आहे. त्यांना पकडण्यासाठी तीन पथके तयार करण्यात आली असल्याची माहिती डीएसपी नागेंद्र यांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, मुलगी वडिलांसोबत मंदिरात दर्शन करून घरी परतत होती. दरम्यान पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये काही हल्लेखोर आले आणि त्यांनी तरुणीला जबरदस्तीने ओढत गाडीत बसवले. मुलीच्या वडिलांना काही समजायच्या आत सर्व चोरटे पळून गेले. मात्र, मुलीच्या वडिलांनी कारला अडवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना यामध्ये यश आले नाही.