मुंबई 20 डिसेंबर : आजकाल काळ बदलला आहे, त्यामुळे बऱ्याचदा नवरा-बायको पार्टी करताना एकत्र दारु वैगरे घेतात. दारु आरोग्यासाठी हानिकारकच आहे. पण असे असले तरी काही लोकांच्या मान्यतेप्रमाणे यामुळे त्यांना आनंद मिळतो. पण या दारुमुळे स्वत:चं घर देखील तुम्ही उद्वस्त करु शकता असं तुम्हाला सांगितलं तर तुमचा विश्वास बसेल? नाही ना?… पण याच संदर्भातील एक बातमी सध्या समोर आली आहे. ज्यामध्ये असं सांगितलं जात आहे की, रात्री मित्र-परिवारासोबत दारुची पार्टी केल्यानंतर एका बायकोने तिच्या नवऱ्याची हत्या केली आहे. हो ही घटना खरी आहे जी उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यात घडली असल्याचे समोर आले आहे. हे ही वाचा : आधी प्रेम, मग प्रेग्नेन्ट… गर्लफ्रेंड ऐकली नाही म्हणून थेट कहाणीचा The End, नक्की असं काय घडलं? जे घर रात्रीपर्यंत मजा-मस्तीत होते त्याच घरात सकाळी डोळे उघडताच, शोककळा पसरली. या खळबळजनक बातमीने आजूबाजूच्या परिसरातील लोकांना धक्का बसला आहे. असं सांगितलं जात आहे की, या आरोपी पत्नीचे तिच्या दिरासोबत अवैध संबंध होते. पण याबद्दल छोस माहिती समोर आलेली नाही. सध्या पोलिसांनी आरोपी पत्नीला अटक केली आहे. यासोबतच अन्य नातेवाईकांनाही ताब्यात घेऊन चौकशी करण्यात येत आहे. ही संपूर्ण घटना बाराबंकीमधील कोठी पोलीस स्टेशन हद्दीतील पिरपूर गावातील आहे. जहान येथील रहिवासी विनय राज आणि त्यांची बायको राधा यांच्यासह त्यांच्या नातेवाईकांनी शनिवारी रात्री घरी दारू पार्टी केली. दारूच्या पार्टीत नवरा-बायको दोघांनीही आपापल्या नातेवाईकांसह भरपूर दारू प्यायली. त्यानंतर पार्टी आटोपल्यानंतर सर्व नातेवाईक आपापल्या घरी गेले, मात्र बायको राधाला त्यांच्यातील एका वादाचा इतका राग आला की तिने पहाटे पती विनय राजवर हल्ला करून त्याची हत्या केली. काही वेळाने पत्नी राधा हिने स्वतः गावकऱ्यांना आरडाओरड करून हा प्रकार सांगितला. मृत विनय राज हा लखनौ जिल्ह्यातील एका टेंट हाऊसमध्ये मजूर म्हणून काम करत होता आणि शुक्रवारी संध्याकाळीच घरी आला होता. तर दुसरीकडे आरोपी बायकोचे तिच्या दीरासोबत अनैतिक संबंध असल्याचं देखील बोललं जात आहे. मृताचा विवाह आरोपी बायको राधा हिच्यासोबत 10 वर्षांपूर्वी झाला होता. दोघांना शिव आणि नीलम ही दोन मुले आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी श्वानपथक आणि फॉरेन्सिक पथकासह घटनास्थळी तपास करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. तसेच मृताच्या भावाच्या तक्रारीवरून आरोपी पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
मृताची आई कांती देवी यांनी सांगितले की, सून राधा हिच्या ओरडण्याने पहाटे एकच खळबळ उडाली. खोलीत गेल्यावर विनय राज यांच्या मुलाचा रक्ताने माखलेला मृतदेह जमिनीवर पडलेला होता.