मुंबई 18 जून : मीरारोडचं सरस्वती वैद्य हत्याकांड देशाला हादरवून टाकणारं आहे. 56 वर्षांच्या मनोज सानेच्या क्रूरतेला कोणतीच सीमा राहिली नव्हती. त्याने आपली लिव्ह इन पार्टनर सरस्वतीची हत्या करून तिच्या मृतदेहाचे तुकडे केले आणि कुकरमध्ये शिजवले. दिवसेंदिवस या प्रकरणात नव नव्या अपडेट समोर येत आहेत. अशातच आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मनोज साने यांने सरस्वतीचे तुकडे करण्याआधी तिच्या विवस्त्र मृतदेहासोबत स्वतः नग्न होऊन सेल्फी काढले. नंतर त्याने पॉर्न व्हिडिओ पाहिल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे. साने याने सरस्वतीपासून लैंगिक आजाराची माहिती लपवली होती, असंही सांगितलं जात आहे. पोलिसांनी सादर केलेल्या पुराव्यानुसार, मनोज साने याचे इतर महिलांशी संबंध होते. सानेने आपल्या जबाबात तो एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याचंही सांगितलं होतं. Mumbai Mira Road Murder : सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे उकळले, प्रेशर कुक केले अन् तळलेही; सेक्स अॅडिक्ट साने असं का वागला? पोलिसांनी साने याची मुंबईच्या जेजे रुग्णालयात गुरुवारपासून मनोवैज्ञानिक चाचणी सुरू केली आहे. गुरुवारी व शुक्रवारी दोन दिवस चाचणी झाली असून आता सोमवारी पुन्हा चाचणीसाठी नेण्यात येणार आहे. सरस्व्तीची आत्महत्या नाही, तर हत्याच - आरोपीने सरस्वती वैद्य हिने 3 जूनला विष पिऊन आत्महत्या केल्याचं सांगितलं होतं. तसंच पोलिसांचा सासेमिरा आपल्यावर लागू नये म्हणून मृतदेहाची विल्हेवाट लावल्याचा बनाव आरोपी आखत होता. मात्र आता पोलीस तपासात सरस्वती वैद्य हिची हत्या केल्याचं समोर येत आहे. हत्या करण्यापूर्वी मनोज सानेने बोरीवलीच्या आदर्श स्टोअर्स या नर्सरीच्या दुकानातून कीटकनाशक खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे. सोमवारी दुपारी पोलिसांनी आरोपी सानेला बोरीवलीच्या बाभई येथील एका नर्सरीच्या दुकानात नेलं होतं. तिथे केलेल्या चौकशीत साने यानेच किटकनाशक खरेदी केल्याचं उघड झालं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.