मीरारोड, 14 जून : मीरारोडची घटना वाचताना कोणाच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. 56 वर्षांच्या मनोज सानेच्या क्रूरतेला कोणतीच सीमा राहिली नव्हती. ही घटना अख्ख्या देशाला हादरवून सोडणारी आहे. आधी आफताब आणि आता साने. दिवसेंदिवस या प्रकरणात नव नव्या अपडेट समोर येत आहेत. सरस्वती विष प्यायल्याचा खोटा बनाव आरोपीने सरस्वती वैद्य हिने 3 जूनला विष पिऊन आत्महत्या केल्याचं सांगितलं होतं. तसंच पोलिसांचा सासेमिरा आपल्यावर लागू नये म्हणून मृतदेहाची विल्हेवाट लावल्याचा बनाव आरोपी आखत होता. मात्र आता पोलीस तपासात सरस्वती वैद्य हिची हत्या केल्याचं समोर येत आहे. हत्या करण्यापूर्वी मनोज सानेने बोरीवलीच्या आदर्श स्टोअर्स या नर्सरीच्या दुकानातून कीटकनाशक खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे. सोमवारी दुपारी पोलिसांनी आरोपी सानेला बोरीवलीच्या बाभई येथील एका नर्सरीच्या दुकानात नेलं होतं. तिथे केलेल्या चौकशीत साने यानेच किटकनाशक खरेदी केल्याचं उघड झालं आहे. त्यामुळे सानेनं तिला विष देवून, तिची हत्या का केली? याबाबत पोलीस तपास करीत आहेत. सरस्वतीसोबत तुंगारेश्वर मंदिरात केलं लग्न सोमवारी मयत सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे तिच्या बहिणींनी जे.जे. रुग्णालयातून घेतले आहेत. त्यानंतर सरस्वतीवर मुंबईतील रे रोड स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. त्याचबरोबर सोमवारी सरस्वतीच्या तिन्ही बहिणींचे डीएनए नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. सानेने सरस्वतीसोबत मंदिरात लग्न केल्याची माहिती पोलिसांना सरस्वतीच्या बहिणींनी दिली होती. 2014 साली भिंवडीच्या वज्रेश्वरी देवीच्या मंदिरात लग्न केल्याची माहिती आता सुत्रांकडून मिळत आहे. Mumbai Mira Road Murder: मनोज साने नर्सरीत गेला अन्..; सरस्वतीची आत्महत्या नाही तर हत्याच! पोलीस तपासात धक्कादायक खुलासा सानेचं वागणं संशयास्पद मनोज नेहमी चेहरा लपवून चेहऱ्यांवर मास्क लावूनच घराबाहेर पडायचा. तर, सोसायटीतील कार्यक्रमांना मनोज आणि सरस्वतीने कधीच हजेरी लावली नाही. एवढंच काय तर मनोजच्या शेजारी राहणाऱ्या विवेक यांनी त्यांच्या मुलाच्या बर्थ-डे पार्टीचे निमंत्रण द्यायला गेले होते, तेव्हा मनोजने विवेक यांच्याशी बोलणे टाळले. एवढचं काय तर मनोज याचे वागणे आम्हाला नेहमी संशयास्पद वाटत होते, असा खुलासा देखील मनोजच्या शेजाऱ्यांनी केला आहे. असा रचला सरस्वतीच्या हत्येचा प्लान आरोपीच्या मोबाईलवरून पोलिसांना अनेक महत्त्वाच्या गोष्टी मिळाल्या आहेत. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मनोज सानेने ओटीटीवर वेब सीरिज पाहिल्यानंतर त्याची लिव्ह-इन पार्टनर सरस्वतीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा कट रचला होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीवर श्रद्धाचा खून प्रकरणाचा प्रभाव होता, मात्र सरस्वतीसोबत हे सगळं करण्याआधी त्याने एक वेब सीरीज पाहिली होती आणि त्या आधारे त्याने प्लान बनवला होता. साने सेक्स अॅडिक्ट होता? पोलिसांनी सादर केलेल्या पुराव्यानुसार, मनोज साने याचे इतर महिलांशी संबंध होते. सानेने आपल्या जबाबात तो एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याचंही सांगितलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.