जाहिरात
मराठी बातम्या / क्राइम / अनाथाश्रमात बालपण ते प्रियकराकडून क्रूर अंत, Mira Road Murder Case ची Inside Story

अनाथाश्रमात बालपण ते प्रियकराकडून क्रूर अंत, Mira Road Murder Case ची Inside Story

अनाथाश्रमात बालपण ते प्रियकराकडून क्रूर अंत

अनाथाश्रमात बालपण ते प्रियकराकडून क्रूर अंत

Mira Road murder case updates : ना नात्याला नाव…ना जगण्याला आधार, आयुष्यभर प्रेमाच्या शोधात राहिली सरस्वती तिच्यासोबत जे घडलं ते भयंकर… Mira Road Murder Case ची Inside Story

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई : प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं आपल्याला राहायला घर आणि चार सुखाचे क्षण मिळावेत ज्यात आपली माणसं असावीत मात्र सरस्वतीच्या नशीबात काहीतरी वेगळंच लिहिलेलं होतं. अनाथालयात वाढलेल्या सरस्वतीचा डोळ्यात खूप मोठी स्वप्न होती. मात्र परिस्थितीपुढे तिचं काही चालत नव्हतं. यात ती गोड बोलणाऱ्या वडिलांच्या वयाच्या असलेल्या व्यक्तीच्या जाळ्यात फसली आणि तिच्यासोबत दुर्देवी प्रकार घडला. तिची सगळी स्वप्न अधुरी राहिली, ना तिचा सुखानं संसार रंगला ना आर्थिक स्थैर्य मिळालं, तिचा अखेर वाईट पद्धतीनं बळीच गेला. चार सुखाचे क्षण तर सोडाच पण ज्याच्यावर विश्वास ठेवला त्यानेच क्रूरतेचा कळस गाठला. हृदय पिळवटून टाकणारी घटना मिरा रोड परिसरात घडली. अनाथ सरस्वतीची लिव्हइनमध्ये राहणाऱ्या पार्टनरने निर्घृण हत्या केली. तिचे तुकडे केले आणि पुरावे नष्ट करताना तो सापडला आणि पोलिसांनी बेड्या ठोकल्या. खरंतर सरस्वती वैद्यचं बालपण अनाथाश्रमात गेलं आहे. चार बहिणींसोबत ती तिथे मोठी झाली, पुढे बहिणींची लग्न झाली खरी पण परिस्थितीने काही त्यांनाही म्हणावी तशी साथ दिली नाही. सर्वात लहान सरस्वती, एका बहिणीने तर लग्नाच्या दोन वर्षांत विष प्राशन करुन स्वत:ला संपवलं. त्यामुळे बहिणीचं असलेलं एक छत्रही हरपलं.

Saraswati Vaidya Murder Case : छ. संभाजीनगरची सरस्वती मुंबईत कशी आली? मोठी अपडेट समोर

दहावीपर्यंतचं शिक्षण अनाथाश्रमात झालं. त्यानंतर पुढे काय हा प्रश्न तिच्या डोळ्यासमोर होता. परिस्थिती अत्यंत बिकट असल्याने पुढे शिक्षण घेणं शक्य नव्हतं. काही दिवस ती आपल्या बहिणींकडे राहिली. आळीपाळीने बहिणींची घर बदलत राहिली मात्र प्रेमाचा ओलावा तिला काही मिळाला नाही. अडचणी काही केल्या संपेना किती दिवस विंचवाचं घर पाठीवर घेऊन फिरणार असं तिला झालं. नोकरीच्या शोधात असताना सरस्वतीची आरोपी सानेशी ओळख झाली. तिच्या वडिलांच्या वयाचा जवळपास हा आरोपी आहे. मात्र त्याने मदत करण्याच्या बहाण्याने हळूहळू तिचा विश्वास संपादन केला. 2013 मध्ये पहिल्यांदा ते भेटले, त्यानंतर हळूहळू ओळख वाढली आणि पुढे त्यांनी आपल्या घरात सरस्वतीला राहण्यासाठी आणलं. Mira Road Murder : सरस्वती आणि मनोज साने सोसायटीत कसे राहत होते? शेजाऱ्यांनी केला मोठा खुलासा सानेनं स्वत:च्या घरात आसरा दिला मात्र त्याने आपला हेतू साध्य करुन घेतला आणि सरस्वतीने आतापर्यंत त्याचं जे रुप पाहिलं नव्हतं ते पाहिलं. त्याने सरस्वतीला समजवण्याच्या बहाण्याने तुंगारेश्वर मंदिरात नेलं आणि तिथे गेल्यावर थेट लग्नच केलं. या धक्क्यातून सरस्वती स्वत:ला सावरु शकली नाही. वडिलांच्या वयाचा असलेला व्यक्ती आता आपला पती झाला होता. वयातलं अंतर आणि अचानक झालेलं लग्न यातून तिला होणार मासिक त्रास वेगळाच होता. ज्याला मामा मानलं त्यालाच समाजात पती म्हणून कसं सांगणार हा तिचासमोर मोठा प्रश्न होता. तिने हळूहळू परिस्थिती स्वीकारायला सुरुवात केली. मात्र वेळोवेळी काही ना काही कारणांमधून दोघांमध्ये खटके उडायला लागले.

News18लोकमत
News18लोकमत

सानेच्या डोक्यात राग गेला आणि त्याने तिचा कायमचा काटा काढला. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याने कटरने तुकडे केले, ते शिजवले तळले आणि काही कुत्र्यांना खाऊ घातले तर काही घरात पुरावे नष्ट करताना तो सापडला. शेजारच्यांनी दुर्गंध येत असल्याची तक्रार पोलिसांना केल्यानंतर हा माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार उघडकीला आला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात