जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / नातं हरलं! माशावरुन झालेला वाद पोहोचला टोकाला; भाच्यानं मामासोबत केलं निर्दयी कृत्य

नातं हरलं! माशावरुन झालेला वाद पोहोचला टोकाला; भाच्यानं मामासोबत केलं निर्दयी कृत्य

नातं हरलं! माशावरुन झालेला वाद पोहोचला टोकाला; भाच्यानं मामासोबत केलं निर्दयी कृत्य

केवळ 120 रुपयांसाठी एका युवकानं आपल्या मामाची चाकूनं भोसकून हत्या (Murder) केली आहे. दोघांमध्ये माशाचे (Fish) पैसे देण्यावरुन वाद झाला होता.

  • -MIN READ
  • Last Updated :

भोपाळ 06 जुलै: केवळ 120 रुपयांसाठी एका युवकानं आपल्या मामाची चाकूनं भोसकून हत्या (Murder) केली आहे. दोघांमध्ये माशाचे (Fish) पैसे देण्यावरुन वाद झाला होता. वाद इतका टोकाला पोहोचला की भाच्यानं आपल्या मामावरच हल्ला केला. जखमी अवस्थेत असलेल्या मामाला रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आलं. मात्र, त्यांचा मृत्यू झाला. सध्या आरोपी भाचा फरार आहे.. नवरा गेला दारुच्या आहारी अन् सासरा-सुनेचंच जुळलं सूत; लग्नगाठही बांधली मात्र… हे प्रकरण मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) ग्वालियरमधील आहे. रविवारी रात्री आरोपी कल्लूनं आपला मामा कयूम खान याच्यावर चाकूनं हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या कयूम यांचा मृत्यू झाला. कुटुंबीयांनी सांगितलं, की कयूम खान मासे विक्रीचा व्यवसाय करायचा. तर, जवळच भाचा कल्लू खान माशाचं फ्राय बनवण्याचं काम करायचा. सात फेऱ्याआधीच नवरदेवानं केली विचित्र मागणी; मंडपातून रिकाम्या हाती परतली वरात रविवारी रात्री कल्लूनं आपल्या मामा कयूमकडून 120 रुपयांचे मासे खरेदी केले. मात्र, कयूमनं भाच्याकडे पैशाची मागणी केली असता कल्लूनं शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. दोघांमधील वाद इतका वाढला की कल्लूनं आपल्या मामावर हल्ला केला. याच घटनेत कयूम यांचा मृत्यू झाला. यानंतर आरोपी भाचा फरार झाला. कयूम खानच्या कुटुंबीयांनी सांगितलं, व्यवसायावरुन याआधीही त्यांच्यात अनेकदा भांडण झालं होतं. कुटुंबीयांनी आरोपी कल्लूविरोधात कठोर कारवाईची मागणी केली आहे. पोलिसांनी आरोपी कल्लूवर हत्येचा गुन्हा दाखल केला असून सध्या त्याचा तपास सुरू आहे. मध्यरात्री अंगावर पेट्रोल टाकून सासूला पेटवलं; पोलीस हवालदार सुनेचा प्रताप

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात