मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /नवरा गेला दारुच्या आहारी अन् सासरा-सुनेचंच जुळलं सूत; लग्नगाठही बांधली मात्र...

नवरा गेला दारुच्या आहारी अन् सासरा-सुनेचंच जुळलं सूत; लग्नगाठही बांधली मात्र...

नुकतंच समोर आलेल्या एका प्रकरणामध्ये एका व्यक्तीनं आपल्या पत्नीच्या मृत्यूनंतर सुनेसोबतच लग्नगाठ (Man Tied Knot With Daughter-in-law) बांधली. यानंतर स्वतःच्या दोन्ही मुलांना सोडून तो शहरात आपल्या सुनेसोबत राहू लागला.

नुकतंच समोर आलेल्या एका प्रकरणामध्ये एका व्यक्तीनं आपल्या पत्नीच्या मृत्यूनंतर सुनेसोबतच लग्नगाठ (Man Tied Knot With Daughter-in-law) बांधली. यानंतर स्वतःच्या दोन्ही मुलांना सोडून तो शहरात आपल्या सुनेसोबत राहू लागला.

नुकतंच समोर आलेल्या एका प्रकरणामध्ये एका व्यक्तीनं आपल्या पत्नीच्या मृत्यूनंतर सुनेसोबतच लग्नगाठ (Man Tied Knot With Daughter-in-law) बांधली. यानंतर स्वतःच्या दोन्ही मुलांना सोडून तो शहरात आपल्या सुनेसोबत राहू लागला.

लखनऊ 06 जुलै : नुकतंच समोर आलेल्या एका प्रकरणामध्ये एका व्यक्तीनं आपल्या पत्नीच्या मृत्यूनंतर सुनेसोबतच लग्नगाठ (Man Tied Knot With Daughter-in-law) बांधली. यानंतर स्वतःच्या दोन्ही मुलांना सोडून तो शहरात आपल्या सुनेसोबत राहू लागला. जेव्हा मुलांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागला तेव्हा हे प्रकरण समोर आलं. मोठ्या मुलाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी (Police) याप्रकरणाचा तपास सुरू केला. ही घटना उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) बदायू जिल्ह्यातील आहे.

बदायू जिल्ह्यातील कस्बा बिसौली गावातील दबतरा येथील रहिवासी असलेल्या 45 वर्षीय देवानंद याच्या पत्नीचं 2015 मध्ये निधन झालं. यावेळी देवानंदचं वय 39 वर्ष होतं. देवानंदच्या नातेवाईकांनी त्याला दुसरं लग्न करण्याचं सुचवलं. मात्र, देवानंदनं त्यावेळी आपला 15 वर्षीय मुलगा सुमित याचा विवाह करण्याचा निर्णय घेतला आणि 2016 मध्ये सुमितचं लग्न लावण्यात आलं. लग्नानंतर सहा महिन्यातच सुमित आणि त्याच्या पत्नीमध्ये वाद होऊ लागले. याच कारणामुळे दोघांमध्ये दुरावा आला. यादरम्यान सुमितच्या पत्नीची आपल्या सासऱ्यासोबत जवळीक वाढली.

आईच्या शोधात निघालेल्या मुलाला शेतात सापडला मृतदेह; चेहरा बघताच फोडला हंबरडा

2017 साली वडील देवानंद यांच्या एका निर्णयामुळे सुमितचं संपूर्ण आयुष्यच बदललं. देवानंदनं सुमितच्या पत्नीसोबत कोर्ट मॅरेज केलं आणि दोघंही संभल जिल्ह्यात जाऊन राहू लागले. या दोघांना एक मुलगाही झाला, तो सध्या एक वर्षाचा आहे. मात्र, या काळात देवानंदनं आपल्या मुलांची जबाबदारीही घेतली होती. सुमितला दारू आणि जुगाराची सवय होती आणि यासाठी लागणारे पैसे तो देवानंद यांच्याकडूनच घेत असे. मात्र, काही काळानंतर त्यांनी मुलाला पैसे देणं बंद केलं. यानंतर वकीलांच्या म्हणण्यानुसार, सुमितनं RTI च्या माध्यमातून आपल्या वडिलांच्या पगारासंबंधीची माहिती मागितली. याशिवाय त्यानं आपली पत्नी हरवल्यानं तिला शोधण्यासाठी पोलिसांतही मदत मागितली.

याप्रकरणी तपास करताना पोलिसांनी देवानंद आणि त्याचा मुलगा सुमित यांना ठाण्यात बोलावलं. ठाण्यात सुमित पैसे आणि आपला सांभाळ वडिलांनी करावा अशी मागणी करू लागला. याच कारणामुळे दोघांमध्ये वादही झाले. यानंतर पंचायत बोलावण्यात आली, यात सुमितच्या पत्नीनं आपल्याला सासऱ्यासोबतच राहायचं असल्याचं सांगितलं. तिनं म्हटलं की सासराच तिचा पती असून त्यांनी कोर्ट मॅरेजही केलं आहे.

डॉक्टरकडे जातो सांगून गेला आणि... नवरदेवाचा मृतदेह पाहून कुटुंबाला धक्का

जेव्हा लग्न झालं तेव्हा सुमित अल्पवयीन होता. त्याचा बालविवाह झाला होता. यामुळे सुमित आपल्या लग्नाचा कोणताही लिखित पुरावा देऊ शकला नाही. महिलेनंही सुमितसोबत आपलं लग्न झालं होतं, या गोष्टीला नकार दिला नाही. सुमितला फक्त आपल्या वडिलांकडून खर्चासाठी पैशांची अपेक्षा आहे.

First published:
top videos

    Tags: Child marriage, Love story, Marriage