मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /सात फेऱ्याआधीच नवरदेवानं केली विचित्र मागणी; लग्नमंडपातून रिकाम्या हाती परतली वरात

सात फेऱ्याआधीच नवरदेवानं केली विचित्र मागणी; लग्नमंडपातून रिकाम्या हाती परतली वरात

एका लग्नसमारंभात (Marriage Function) सर्व कार्यक्रम अत्यंत शांततेत सुरू होते. मात्र, अचानक फेरे सुरू असतानाच नवरदेवाच्या घरच्यांनी लग्नास नकार दिला

जयपूर 06 जुलै : एका लग्नसमारंभात (Marriage Function) सर्व कार्यक्रम अत्यंत शांततेत सुरू होते. मात्र, अचानक फेरे सुरू असतानाच नवरदेवाच्या घरच्यांनी नवरीच्या कुटुंबीयांकडे पैशाची आणि गाडीची मागणी (Dowry ) केली. यावर नवरीच्या वडिलांनी सांगितलं की मी एक गरीब शेतकरी (Farmer) आहे, त्यामुळे इतकं सगळं देणं मला शक्य नाही. याच कारणावरुन दोन्ही पक्षांमध्ये वाद झाला आणि हुंडा न मिळाल्यानं वरात नवरीला (Bride) न घेताच घरी परतली.

यानंतर पीडित कुटुंबीयांनी नवरदेवाकडच्या लोकांची समजूत काढण्यासाठी अनेक प्रयत्न केले. मात्र, याचा काहीही फायदा झाला नाही. हे लोक पैसे आणि गाडीची मागणी करतच राहिले. यानंतर पीडित कुटुंबीयांनी सीकर जिल्हा पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे न्यायाची मागणी केली आहे.

मध्यरात्री अंगावर पेट्रोल टाकून सासूला पेटवलं; पोलीस हवालदार सुनेचा प्रताप

पीडित नवरीनं सांगितलं, की तीन जुलै रोजी तिचा विवाह बुगाला गावातील अजय याच्यासोबत होणार होता. लग्नासाठी वरात तारपुरा गावात आली आणि सर्वांनी जेवणही केलं. मात्र, जेव्हा वरमाळा घालण्याची वेळ आली तेव्हा मुलाच्या कुटुंबीयांनी म्हटलं, की वरमाळेसोबतच प्रत्येक गोष्टीची व्यवस्था तुम्हालाच करावी लागेल. यानंतर नवरीचा भाऊ बाजारात जाऊन वरमाळा घेऊन आला.

नवरा गेला दारुच्या आहारी अन् सासरा-सुनेचंच जुळलं सूत; लग्नगाठही बांधली मात्र...

नवरीनं सांगितलं, की फेऱ्याच्या वेळीच नवरदेव आपल्या मित्रासोबत बाहेर गेला आणि नवरदेवाच्या वडिलांनी माझ्या वडिलांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. नवरीनं असा आरोप केला की नवरदेवाच्या वडिलांनी म्हटलं, पैसे, दागिने आणि दुचाकी मिळाली तरच हे लग्न होईल. नवरीच्या वडिलांनी आपण गरीब शेतकरी असल्याचं सांगत आपल्याकडे इतके पैसे नसल्याचं स्पष्ट केलं. यानंतर वरात मंडपातून निघून गेली. पोलिसांत याबाबत तक्रार केली असता असं म्हटलं गेलं, की मुलानं स्वतःच्या इच्छेनं लग्नाला नकार दिला आहे, अशात आम्ही काहीच करू शकत नाही.

First published:
top videos

    Tags: Bridegroom, Marriage, Wedding