लखनऊ 23 मे : एकीकडे संपूर्ण देश कोरोना (Coronavirus) महामारीचा सामना करत असतानाच दुसरीकडे एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. यात एकाच कुटुंबातील पाच जणांची हत्या (Five of a Family Found Killed in Ayodhya) करण्यात आली आहे. यातील तिघांचं वय दहा वर्षापेक्षाही कमी होतं. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मात्र, ही हत्या नेमकी कोणी केली, याचा शोध घेण्यात पोलिसांना अद्याप यश आलेलं नाही. हे प्रकरण उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) अयोध्येतील इनायतनगर ठाण्याच्या क्षेत्रातील आहे.
...अन् कोरोनाबाधित रुग्णाचा मृतदेह चादरीतच गुंडाळला, चिपळूणमधील धक्कादायक घटना
या घटनेच एकाच कुटुंबातील पाच जणांची धारदार शस्त्रानं हत्या करण्यात आली आहे. यात पती-पत्नी आणि तीन मुलांचा मृत्यू झाला आहे. या तिघांमधील दोन मुलं तर एक मुलगी आहे. या तिघांचंही वय दहा वर्षापेक्षा कमी आहे. असा अंदाज लावला जात आहे, की मालमत्तेच्या वादवरुन ही हत्या झाली आहे. या घटनेनंतर आरोपी फरार झाले आहेत. ही हत्या करण्यात किती जणांचा समावेश होता, याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही. या घटनेची माहिती मिळताच अयोध्येतले उच्च अधिकारी घटनास्थळी रवाना झाले.
PPE Kits बाबत सरकारवर टीका करणाऱ्या डॉक्टरचा मृत्यू, निलंबनामुळे नैराश्यान घेरलं
कोरोनाकाळातही देशात हत्या आणि बलात्काराच्या घटनांमध्ये कमी येत नसल्याचं चित्र आहे. उत्तर प्रदेशमध्ये 31 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आलं आहे. राज्य सरकारनं अशी सूचना दिली आहे, की आधीपासून असणारे निर्बंध पुढील आठवड्यातही कायम राहातील. योगी सरकारच्या कॅबिनेट बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. या काळात अत्यावश्यक कामांसाठीच बाहेर पडण्यास परवानगी देण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ayodhya, Crime news, Murder