मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /PPE Kits कमतरतेमुळे सरकारवर टीका करणाऱ्या डॉक्टरचा मृत्यू, निलंबनामुळे नैराश्याने घेरलं

PPE Kits कमतरतेमुळे सरकारवर टीका करणाऱ्या डॉक्टरचा मृत्यू, निलंबनामुळे नैराश्याने घेरलं

विशाखापट्टणमच्या एका रुग्णालयात पीपीई किट्स (Shortage of PPE Kits) संदर्भात ज्यांनी गेल्यावर्षी अगदी सुरुवातीला समस्या मांडली होती त्या डॉक्टरचा कार्डियाक अरेस्टमुळे मृत्यू झाला आहे.

विशाखापट्टणमच्या एका रुग्णालयात पीपीई किट्स (Shortage of PPE Kits) संदर्भात ज्यांनी गेल्यावर्षी अगदी सुरुवातीला समस्या मांडली होती त्या डॉक्टरचा कार्डियाक अरेस्टमुळे मृत्यू झाला आहे.

विशाखापट्टणमच्या एका रुग्णालयात पीपीई किट्स (Shortage of PPE Kits) संदर्भात ज्यांनी गेल्यावर्षी अगदी सुरुवातीला समस्या मांडली होती त्या डॉक्टरचा कार्डियाक अरेस्टमुळे मृत्यू झाला आहे.

विशाखापट्टणम, 23 मे: कोरोना काळात अनेक समस्यांचा (Coronavirus Pandemic) सामना संपूर्ण देश करत आहे. 2020 पेक्षा 2021 मध्ये अधिक समस्या सामान्यांना भोगाव्या लागल्याची प्रकरणंही समोर आली आहे. दरम्यान गेल्या दीड वर्षात कंबर कसून फ्रंटलाइन वर्कर्स (Front-Line Workers) विशेषत: डॉक्टर्स कामं करत आहेत. त्यांच्या समस्या देखील सातत्याने समोर येत आहे. डॉक्टरांना मारहाण, रुग्णांच्या नातेवाईकांकडून शिवीगाळ, अपुरं PPE Kits, अपुरं वेतन, 12-18 तास शिफ्ट अशा अनेक समस्यांना डॉक्टर, नर्सेस, वॉर्ड बॉय, रुग्णवाहिका चालक यांना सामोरं जावं लागत आहे. दरम्यान गेल्यावर्षी यापैकी महत्त्वाची समस्या मांडणाऱ्या एका डॉक्टरचा मृत्यू झाला आहे.

विशाखापट्टणमच्या एका रुग्णालयात पीपीई किट्स (Shortage of PPE Kits) संदर्भात ज्यांनी गेल्यावर्षी अगदी सुरुवातीला समस्या मांडली होती त्या डॉक्टरचा कार्डियाक अरेस्टमुळे (Cardiac Arrest) मृत्यू झाला आहे. ज्येष्ठ भूलतज्ज्ञ डॉ. के सुधाकर (Dr. K. Sudhakar Dies)  यांनी पीपीई किट्स, मास्क आणि इतर सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक असणाऱ्या सांधनांच्या कमतरतेबाबत चिंता व्यक्त केली होती. त्यावेळी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. डॉ. के सुधाकर यांचे कार्डियाक अरेस्टमुळे  निधन झाले आहे. डॉ. के. सुधाकर यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि दोन मुलं आहेत. शुक्रवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले

हे वाचा-कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची सुरूवात? 'या' ठिकाणी तब्बल 341 मुलांना कोरोनाचा संसर्ग

डॉ. के सुधाकर यांनी पायाभूत सुविधांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. गेल्यावर्षी पँडेमिक सुरू झाल्यानंतर अशाप्रकारे या समस्येवर बोट ठेवणारे ते पहिलेच सरकारी डॉक्टर होते. दरम्यान 8 एप्रिल 2020 रोजी त्यांचे निलंबन करण्यात आले होते. मीडिया अहवालांच्या मते 16 मे रोजी पोलिसांनी त्यांच्याबरोबर हातापायी देखील केली होती आणि आंध्र प्रदेश हायकोर्टाने सीबीआय चौकशीचे आदेश दिले होते. या घटनेचे काही फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. काही दिवसांपूर्वीचे ते कोव्हिडमधून बरे झाले होते. टाइम्स ऑफ इंडियाने त्यांचे एक मित्र पी. विजयकुमार यांच्या हवाल्याने असं म्हटलं आहे की, 'या प्रकरणाचा अंतिम निर्णय 27 एप्रिल रोजी सुनावण्यात येणार होता. जेव्हा याबाबत काहीच कळले नाही तेव्हा ते नैराश्येत गेले होते.' मीडिया अहवलांच्या मते, त्यांच्या कुटुंबीयांनी देखील गेल्या काही दिवसांपासून ते नैराश्याशी सामना करत असल्याचं म्हटलं आहे.

First published:

Tags: Corona, Corona spread, Coronavirus