मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /...अन् कोरोनाबाधित रुग्णाचा मृतदेह चादरीतच गुंडाळला, चिपळूणमधील धक्कादायक घटना

...अन् कोरोनाबाधित रुग्णाचा मृतदेह चादरीतच गुंडाळला, चिपळूणमधील धक्कादायक घटना


या घटनेचा फोटो सध्या सगळीकडे व्हायरल होत असून त्यावर नागरिकांमधून प्रचंड नाराजी व्यक्त केली जाते आहे.

या घटनेचा फोटो सध्या सगळीकडे व्हायरल होत असून त्यावर नागरिकांमधून प्रचंड नाराजी व्यक्त केली जाते आहे.

या घटनेचा फोटो सध्या सगळीकडे व्हायरल होत असून त्यावर नागरिकांमधून प्रचंड नाराजी व्यक्त केली जाते आहे.

चिपळूण, 23 मे : कोकणात (Kokan) कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाबाधित (corona patient) रुग्णांची संख्या कमी होण्याचे नाव घेत नाहीये. तर दुसरीकडे बॉडी कव्हर बॅग (Body cover bag) नसल्यामुळे कोरोनाबधित रुग्णाचा मृतदेह चादरीमध्ये गुंडाळून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. चिपळूणमधील कामथे या शासकीय रुग्णालयात हा प्रकार घडला असून या घटनेनंतर चिपळूणमध्ये (Chiplun) तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

आरोग्य विभागासाठी राज्यसरकार मोठ्या प्रमाणात निधी खर्च करत आहे, शिवाय अनेक सेवाभावी सामाजिक संघटना देखील मोठ्या स्वरूपाची मदत करत असताना चिपळूणमध्ये शनिवारी धक्कादायक प्रकार समोर आला. कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा मृतदेह चक्क एका चादरीमध्ये लपेटून ठेवण्यात आला होता.

पुण्यात कर्जाचं व्याज न दिल्यानं विद्यार्थ्याचं अपहरण;हॉस्टेलमध्ये डांबून मारहाण

या घटनेचा फोटो सध्या सगळीकडे व्हायरल होत असून त्यावर नागरिकांमधून प्रचंड नाराजी व्यक्त केली जाते आहे. सदरच्या घटनेनंतर स्थानिक आमदार शेखर निकम यांनी यंत्रणेला धारेवर धरत पाठपुरावा करून तात्काळ 10 बॉडी कव्हर बॅग उपलब्ध करून दिल्या. मात्र, असे असले तरीही उपजिल्हा रुग्णालयात आवश्यक गोष्टींचा तुटवडा भासत असेल तर ही लोकप्रतिनिधींची नामुष्की असल्याच्या प्रतिक्रिया देखील समोर येत आहेत.

विराट कोहलीच्या मदतीनंतरही वाचला नाही जीव, क्रीडा विश्वातून दु:खद बातमी

या घटनेबाबत सांगताना हॉस्पिटल प्रशासनाकडून अनऑफिशियल सांगण्यात आलं की, चिपळूण तालुक्यात मृत्यूचे प्रमाण अचानक वाढल्यामुळे बॉडी कव्हर बॅग संपल्या आहेत. जिल्हा आरोग्य विभागाकडे याबाबत मागणी केली असून लवकरच मुबलक बॅग उपलब्ध होतील' असे सांगण्यात आले आहे.

First published: