• Home
 • »
 • News
 • »
 • career
 • »
 • कुटुंबात सगळेच डॉक्टर तरीही पाहिलं IAS ऑफिसर होण्याचं स्वप्नं; पहिल्या प्रयत्नात मिळवला दुसरी रँक

कुटुंबात सगळेच डॉक्टर तरीही पाहिलं IAS ऑफिसर होण्याचं स्वप्नं; पहिल्या प्रयत्नात मिळवला दुसरी रँक

रेणू राज या 2014 सालच्या बॅचच्या आयएएस ऑफिसर आहेत.

रेणू राज या 2014 सालच्या बॅचच्या आयएएस ऑफिसर आहेत.

डॉक्टर असूनही आयएएस ऑफिसर बनण्याची इच्छा रेणू राज यांना शांत बसू देत नव्हती. त्यामुळेच त्यांनी UPSCची परीक्षा दिली. कसा अभ्यास केला आणि यश मिळवलं वाचा...

 • Share this:
  नवी दिल्ली, 24ऑगस्ट  : रेणू राज केरळ राज्यांमधील कोट्टायम (Kottayam, Kerala) येथल्या रहिवाशी आहेत. त्यांचे वडील सेवानिवृत्त सरकारी कर्मचारी आहेत. रेणू राज या 2014 सालच्या बॅचच्या आयएएस ऑफिसर आहेत. डॉक्टर असून सुद्धा त्यांनी यूपीएससीची परीक्षा (UPSC Exam)  देण्याचा निर्णय घेतला आणि पहिल्याच प्रयत्नत दुसरा रँक मिळवला. आयएएस अधिकारी रेणू राज (IAS Officer Renu Raj) यांचं प्राथमिक शिक्षण कोट्टायमधील सेंट टेरेसा हायर सेकंडरी स्कूलमध्ये (St. Teresa Higher Secondary School Kottayam) झालं. त्यानंतर त्यांनी एका गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजमध्ये डॉक्टरीचा अभ्यास केला. रेणू यांच्या दोन्ही बहिणी आणि पती डॉक्टर आहेत. मात्र त्यांनी लहानपणापासूनच IAS अधिकारी बनण्याचं स्वप्न पाहिलं होतं. केरळमध्ये डॉक्टर म्हणून काम करत असताना त्यांनी UPSC परीक्षेची तयारी केली आणि परीक्षेमध्ये टॉप केलं. (ना पैसे ना स्मार्टकार्डची गरज; आता तुमच्या नखांनीच करा मनसोक्त शॉपिंग) 2013 सालापासून त्यांनी UPSC परीक्षेची तयारी सुरू केली. त्या दररोज 3 ते 6 तास अभ्यास करायच्या याशिवाय आपला आहार आणि झोपण्याच्या वेळेचंही वेळापत्रक त्यांनी तयार केलं होतं. प्रिलियम आणि मेन्स परीक्षेची त्यांनी एकत्रच तयारी केली. (ऑनलाईन शिक्षणांचा मुलांच्या डोळ्यावर होतोय परिणाम?, असा करा बचाव) प्रीलियमच्या ऑप्शनल सब्जेक्टसाठी त्यांनी कोचिंग क्लासची मदत घेतली. करंट अफेयर्सचा अभ्यास करण्यासाठी रेणू यांनी ‘द हिंदू’ मासिकाचा अभ्यास केला. याशिवाय मॉक टेस्ट आणि उत्तर लिखाणाची जास्त तयारी केली. (रस्त्यावर झाडू मारणाऱ्या महिलेची जिद्द! पूर्ण करून दाखवलं अधिकारी व्हायचं स्पप्न) त्याचा फायदा त्यांना परीक्षेमध्ये झाला इतिहासाच्या अभ्यासासाठी बिपिनचंद्र, पॉलिटिक्सच्या अभ्यासासाठी लक्ष्मीकांत, भूगोलाकरता एनसीईआरटी, करंट अफेअरसाठी पेपर आणि मासिकांचा अभ्यास करण्याचा सल्ला रेणू राज यांनी विद्यार्थ्यांना दिलेला आहे. याशिवाय सायन्स आणि टेक्नॉलॉजीच्या अभ्यासाकरता ऑनलाईन कन्टेन्टचा अभ्यास करण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे.
  Published by:News18 Desk
  First published: