दुबई, 15 जुलै: शॉपिंग (Shopping) म्हटलं की पैसा आलाच. मग तुम्हाला एकतर तुमच्या खिशार पैशांनी (Money) भरलेलं वॉलेट असायला हवं किंवा पैशांचं स्मार्टकार्ड (Smartcard). पण या दोन्ही गोष्टी तुम्ही घरी विसरलात तर मग काय? डोंट वरी. तुमच्या खिशात पैसे किंवा स्मार्टकार्ड काही नसलं तरी तुम्ही शॉपिंग करू शकता. कसं? तर तुमच्या नखांनी (Shopping by nail). काय? नखांनी शॉपिंग (Smartnail)! कसं काय काय शक्य आहे? असंच तुम्ही म्हणाल नाही का?
पण हे खरं आहे. आता तुमच्या कायम सोबत असलेली तुमच्या शरीराचा एक भाग असलेली नखं. यामार्फतसुद्धा तुम्ही शॉपिंग करू शकता. या छोट्याशा नखांमध्ये तुम्ही बराच खजाना ठेवू शकता. दुबईत लोक सध्या अशीच शॉपिंग करत आहेत. आता हे कसं शक्य आहे ते पाहुयात.
दुबईत सध्या माइक्रोचिप मॅनिक्योर (Microchip Manicure) चर्चेत आहे. दुबईतील लोक आपलं क्रेडिट आणि डेबिट कार्ड आपल्या बोटांच्या नखांवर घेऊन फिरतात. यामध्ये नखांवर एक छोटीशी मायक्रोचिप लावली जाते आणि तुमचं नख चालतं-फिरतं बिझनेस कार्ड बनतं.
हे वाचा - ऑनलाईन शिक्षणांचा मुलांच्या डोळ्यावर होतोय परिणाम?, असा करा बचाव
Lanour Beauty Lounge मार्फत ही सर्व्हिस दिली जाते आहे. Lanour Beauty Lounge च्या मते, हे Near Field Communication म्हणजे NFC वर काम करणारी एक शॉर्ट रेंज वायरलेस टेक्नॉलॉजी आहे. जी स्मार्टफोन, पेमेंट कार्ड्स आणि इतर डिव्हाइसना आणखी स्मार्ट बनवते.
सलूनमध्ये जाऊन तुम्हाला तुमच्या नखांवर ही चिप लावावी लागेल. यासाठी कोणतीही सर्जरी करण्याची किंवा इंजेक्शनचीही गरज नाही. अगदी सहजसोप्या पद्धतीने नखांच्या वरच्या भागावर ही चिप लावली जाते आणि त्याला सुरक्षित ठेवण्यासाठी खास कोटिंग चढवलं जातं. तुमच्या सोशल मीडियापासून बिझनेस कार्डपर्यंतचा सर्व डेटा या छोट्याशा चीपमध्ये टाकला जातो. तुम्हाला जेव्हा गरज पडले तेव्हा स्कॅन करून तो डिकोड होतो.
हे वाचा - मृत व्यक्तीच्या दात, केसांपासून ज्वेलरी; तरुणीला आगळेवेगळे दागिने बनवण्याची आवड
Lanour Beauty Lounge चे सीईओ नूर मेकरेम (Nour Makarem) यांनी सांगितलं, हे खूप कठीण होतं पण आता लोकांना आवडू लागलं आहे. कोरोना महासाथीत स्मार्ट नेल्स खूप महत्त्वाचे ठरत आहेत. दुबईत जवळपास 500 लोकांना ही सर्व्हिस देण्यात आली आहे. एका मॅनिक्युर सेशनसाठी 70 यूएस डॉलर म्हणजे जवळपास 5000 रुपये खर्च आहे. या चीपवर नेलपेंटही लावू शकता तरीसुद्धा हे स्कॅन होईल. यामार्फत स्मार्टफोन किंवा इतर डिव्हाइसचा डेटा वापरता येईल. याचा अर्थ कुणाचं ट्रॅकिंग करता येणार नाही. या चीपची क्षमता आणखी वाढवण्याचा आता प्रयत्न आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Lifestyle, Technology