नवी दिल्ली, 14 ऑगस्ट : एखाद्या व्यक्तीने किती गुणसंपन्न असावं याचं उदाहरण आहे आयएस ऑफिसर प्रियांका शुक्ला (IAS Officer Priyanka Shukla) प्रियांका शुक्ला या पेशाने डॉक्टर (Doctor) होत्या आणि तरीदेखील त्यांनी यूपीएससीची परीक्षा (UPSC Exam) दिली आणि प्रियांका शुक्ला उत्तम नृत्यांगना आहेत, सुंदर चित्र काढतात, कविता करतात. त्यामुळेच त्यांना सोशल मीडियावर (Social Media) लाखो फॉलोअर्स आहेत. प्रियांका शुकला सोशल मीडियावर अतिप्रचंड ऍक्टिव्ह आहेत आणि नेहमी आपले फोटो शेअर करत असतात.
प्रियंका शुक्ला यांना ट्विटरवर (Twitter) अडीच लाखापेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत तर इंस्टाग्रामवर (Instagram) देखील 10 हजार लोक फॉलो करतात. यावरूनच त्यांची प्रसिद्धी लक्षात येते मात्र ही त्यांची खरी ओळख नाही. आयएएस ऑफीसर (IAS Officer) म्हणून देखील त्यांनी उत्तम कामगिरी केलेली आहे.
(IIT ते UPSC सोपा नव्हता प्रवास; गाव खेड्यातल्या खुशबू गुप्तांनी कसं मिळवलं यश?)
प्रियंका शुक्ला यांनी IAS ऑफिसर व्हावं असं त्यांच्या कुटुंबियांना वाटायचं मात्र लहानपणापासूनच प्रियांका यांना डॉक्टर होण्याची इच्छा होती. त्यामुळेच आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रियांका शुक्ल यांनी एमबीबीएस एंट्रन्स एक्झाम क्लिअर करून लखनऊच्या किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घेतलं. 2006मध्ये एमबीबीएस झाल्यानंतर लखनऊ मध्येच आपली प्रॅक्टिस सुरू केली.
(खराब म्हणून फेकून देऊ नका! मोबाईल चार्जिंग केबलचा करू शकता असा वापर)
डॉक्टर झाल्यावर आपल्या प्रॅक्टीसमध्ये त्या खूष होत्या. पण, एका झोपडपट्टीत राहणाऱ्या महिलेने त्यांचं आयुष्यच बदलून टाकलं. प्रियंका शुक्ला एकदा स्लम एरियामध्ये गेलेल्या होत्या. त्या ठिकाणी एक महिला अतिशय खराब पाणी पीत होती आणि आपल्या मुलाला देखील देत होती. त्यावेळेस प्रियंका शुक्ला यांनी तिला असं न करण्यास सांगितलं.
(फक्त या 7 सवयी लावा; स्मरणशक्ती वाढेल, मेंदू होईल तल्लख)
मात्र, त्यावर त्या महिलेने तू कलेक्टर आहेस का? असा प्रश्न विचारला आणि त्या क्षणी प्रियंका यांनी UPSC परीक्षा पास होऊन IAS ऑफिसर होण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयामुळे त्यांचे कुटुंबीय प्रचंड खुश होते UPSC परीक्षा देण्यासाठी प्रियंका यांनी प्रचंड मेहनत केली.
(आता शाळेतही Period leave; शिक्षिका, विद्यार्थिनींना दिलासा मिळणार?)
पहिल्या प्रयत्नात अपयश आल्यानंतर त्यांनी दुसऱ्यांदा प्रयत्न केला आणि 2009 मध्ये UPSC परीक्षा पास होत IAS ऑफिसर बनण्याचं स्वप्न पूर्ण केलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ias officer, Inspiring story, Success story, Upsc exam