मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

IIT ते UPSC सोपा नव्हता प्रवास; गाव खेड्यातल्या खुशबू गुप्तांनी कसं मिळवलं यश?

IIT ते UPSC सोपा नव्हता प्रवास; गाव खेड्यातल्या खुशबू गुप्तांनी कसं मिळवलं यश?

खुशबू यांनी बारावीपर्यंतचं शिक्षण आपल्या गावामध्ये केलं.

खुशबू यांनी बारावीपर्यंतचं शिक्षण आपल्या गावामध्ये केलं.

ज्या गावात शिक्षणालाच महत्व नाही त्या गावा शिक्षण घेऊन IAS ऑफिसर होण तितकं सोप नव्हतं पण, IAS ऑफिसर खुशबू गुप्ता (IAS Officer Khushboo Gupta) यांनी ते करुन दाखवंल आहे.

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 08 ऑगस्ट : पंजाबच्या भदौड (Bhadaud,Punjab) गावांमध्ये राहणाऱ्या IAS ऑफिसर खुशबू गुप्ता (IAS Officer Khushboo Gupta) यांनी 2018 साली यूपीएससी परीक्षा(UPSC Exam)  देऊन 80वा रँक मिळवला. खुशबू गुप्ता या पंजाबच्या अतिशय खेड्यामध्ये राहणाऱ्या आहेत. त्यांच्या गावांमध्ये अभ्यासाला (Education) फारसं महत्त्व दिलं जात नाही. मात्र, त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना खूप सपोर्ट (Support) केला.

त्यामुळेच त्या आयटी इंजिनीयर (IIT Engineer) होऊ शकल्या आणि त्यानंतर UPSC परीक्षा पास करत आपल्या गावाची मान उंचावली. लहानपणापासूनच खुशबू अभ्यासामध्ये हुशार होत्या. पण, इंजीनियरिंग बॅकग्राऊंड असल्यामुळे UPSC परीक्षेचा अभ्यास जास्त मेहनतीने करावा लागला. 2 वर्ष प्रयत्न केल्यानंतर त्यांना UPSC परीक्षेमध्ये यश आलं.

(हवामान बदलाचा फटका, 'हा' मोठा देश जगाच्या नकाशावरून गायब होण्याची भीती!)

त्यामुळेच एका छोट्या गावांमध्ये राहणारी मुलगी आज आयएएस ऑफिसर (IAS Officer)होऊ शकली. खुशबू यांनी बारावीपर्यंतचं शिक्षण आपल्या गावामध्ये केलं.

(IASसाठी सोडलं लाखोंचं पॅकेज; गुंजन सिंह यांनी घेतला गरीबांसाठी देश सेवेचा निर्णय)

त्यानंतर आयटी दिल्लीमध्ये इंजिनिअरिंगची डिग्री (Degree of Engineering in IT Delhi) पूर्ण केली. इंजिनीयर झाल्यानंतर नेमकं काय करावं या विवंचनेत असताना त्यांनी वडिलांच्या सल्ल्याने UPSC परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. आणि अभ्यासाला सुरुवात केली.

(अपयश येऊनही सोडले नाहीत प्रयत्न; IAS गुंजन द्विवेदी यांची ‘Smart Study Strategy’)

खुशबू दिवसभर कोणत्या विषयाचा अभ्यास करायचा आणि किती अभ्यास करायचा याचं टार्गेट ठरवत असतं आणि त्याचं काटेकोरपणे पालन करत असत. खुशबू यांच्यामते युपीएससी परीक्षेमध्ये प्रचंड मेहनत असली तरीदेखील रिविजन मॉक टेस्ट आणि उत्तर लेखनाची तयारी केली तर नक्कीच यश मिळू शकतं.

First published:

Tags: Ias officer, IIT, Inspiring story, Success stories, Upsc exam