आपला आहार आणि लाईफ स्टाईल याचा परिणाम आपल्या स्मरणशक्तीवर होत असतो. त्यामुळेच आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी बदलायला हव्यात. त्यासाठी काही टिप्स वापरू शकता.
फिश ऑईलमध्ये ओमेगा -3 फॅटी अॅसिड ईकोसापेन्टेनोइक अॅसिड (EPA) आणि डोकोसाहेक्सेनॉइक अॅसिड (DHA) भरपूर असतं. त्यामुळे आरोग्यासाठी फायदेशीर ठरतंच आणि हृदयरोग, छातीत जळजळ होण्याचा धोका कमी करण्यासाठी, स्ट्रेस कमी करण्यासाठी देखील उपयोगी आहे. अभ्यासानुसार फिश ऑइल सप्लीमेंट घेतल्याने स्मरणशक्ती सुधारू शकते.
जास्त साखर खाल्ल्याने आरोग्याशी संबंधित अनेक समस्या वाढू शकतात. काही संशोधनानुसार जास्त गोड पदार्थ खाल्ल्याने स्मरणशक्ती कमी होऊ शकते. आहारातलं साखरेचं प्रमाण कमी केल्यामुळे स्मरणशक्ती सुधारेल आणि आरोग्यही चांगलं होईल.
मेडिटेशन केल्याने आरोग्यावर अनेक प्रकारे सकारात्मक परिणाम होऊ शकतो. यामुळे तणाव कमी होतो, ब्लड प्रेशर संतुलित करण्यास आणि स्मरणशक्ती सुधारण्यास मदत होते.
कमी झोपेमुळेही स्मृरणशक्ती कमी होते. सतत अपूरी झोप होत असेल तर, त्याचा स्मरणशक्तीवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
जास्त प्रमाणात मद्यपान आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं आणि त्याचा स्मरणशक्तीवरही नकारात्मक परिणाम होऊ शकतो. त्यामुळे जास्त प्रमाणात मद्यपान टाळल्याने स्मरणशक्ती चांगली राहू शकते.
ब्रेन गेम्स खेळणं हा स्मरणशक्ती उत्तम ठेवण्याचा पर्याय आहे. स्मरणशक्ती मजबूत करण्यासाठी बुद्धीबळ, कोडं सोडवणं, क्रॉसवर्ड असे खेळ खेळू शकतो.
व्यायाम करणं शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर आहे. लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्व वयोगटातील लोकांची स्मरणशक्ती सुधारण्यास याने मदत होते. अभ्यासानुसार व्यायामामुळे न्यूरोप्रोटेक्टिव्ह प्रथिनांचा स्त्राव वाढून न्यूरॉन्सची वाढ आणि विकास सुधारू शकतं,ज्यामुळे मेंदूचे आरोग्य सुधारते.