नवी दिल्ली, 08 ऑगस्ट : मोबाईल फोनबरोबर (Mobile Phone) त्याचा चार्जरही (Mobile charger) तितकाच महत्त्वाचा असतो. फोन चार्जरच्या वायर (Phone Charger Wire) जपून वापराव्या लागतात. कधीकधी घरातली लहान मुलं वायर तोडतात किंवा चार्जर खराब झाल्यामुळे त्यांच्या वायर पडून राहतात किंवा फेकून दिल्या जातात. पण तुम्हाला माहिती आहे का या खराब झालेल्या वायरचाही तुम्ही वापर करू शकता.
जुन्या खारब झालेल्या चार्जर केबल निरुपयोगी (West) वाटत असल्या तरी त्या निरुपयोगी नसतात. त्या घरी शोपीस (Showpiece) करण्यासाठी वापरल्या जाऊ शकतात. खराब चार्जर केबल वापरून घर सजवू शकता.
बास्केट
खराब चार्जर केबल वापरून एखाद छानसं बास्केट करता येतं. हे बास्केट मजबूत आणि टिकाऊ होतं. यात इकडे तिकडे पडणाऱ्या छोट्याछोट्या वस्तू तयार ठेवू शकता. एक जुना प्लास्टिकचा कप घ्या आणि त्यावर एक जुनं कापड चिटकवा. हवं असेल तर, एखाद्या बाऊलवर लेस लाऊन वापरली तर, बास्केट आणखीन सुंदर दिसेल. त्यासाठी वायरला दोन्ही बाजूने कापा. एका कापडाच्या सहाय्याने कप किंवा बाऊलवर चिटकवा. वायर पातळ असेल तर, तिचा वापर करून विणकाम करून बास्केट करता येईल. त्यानंतर वायर एकातएक गुंडाळून त्याचं कॅन्डल तयार करा आणि तेही बास्केटवर चिटकवा.
(कोरोना संसर्गानंतर केसगळतीने हैराण; ऋजुता दिवेकर यांनी सांगितला उपाय)
पेंटिंग
चार्जर केबल वायर वापरून पेंटिंगही तयार करता येते. चार्जर केबलचे छोटेछोटे तुकडे करा. यासाठी जुन्या पुठ्ठ्यावर पेंटिंग करा किंवा त्यावर जुनं कापड लावा. त्यावर वायर वेगवेगळ्या आकारत चिटकवून त्याला रंग लावा किंवा चार्जर केबल वायरचा वापर करून झाडाच्या आकार द्या. त्यावर कागदाचे तुकडे चिटकवून सुंदर पेंटिंग तयार होऊ शकतं. या फ्रेमला छान लेस लावून सजवा.
(रोज प्या 5 हेल्दी ड्रिंक;डायबेटिज रुग्णांसाठी आहेत संजीवनी)
एक्सेसरीज
याशिवाय सुंदर स्टेटमेन्ट पिसही करू शकता. चार्जर केबल वायरच्या आत तांब्याची वायर असते. तिचाही वापर करता येतो. या वायरला विणू शकता त्यात बिट्स वापरा. याचे इयरिग्स, क्लिप, हेयर बॅन्ड, नेकपीस, लॉन्ग इयरिंग करता येतात. त्यामुळे इथून पुढे चार्जर वायर फेकू नका तिचा जर हटके वापर करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Electrical wire, Home-decor, Lifestyle, Mobile