मुंबई, 25 मे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून 2023 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. दुपारी 2 वाजता पासून सर्व विद्यार्थ्यांना आपला निकाल ऑनलाईन पद्धतीने निकाल बघता येणार आहे. ऑनलाईन निकाल जाहीर झाल्यानंतर शिक्षण मंडळाकडून बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यंदाच्याही निकालामध्ये दरवर्षीप्रमाणे मुलीचं अव्वल आल्या आहेत. पण असं नेहमी का होतं? मुलं अभ्यासात कमी पडतात का? काय आहे यामागचं कारण जाणून घेऊया.
निकाल ऑनलाईन जाहीर होण्यापूर्वी शिक्षण मंडळाकडून पत्रकार परिषद घेण्यात आली. बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषद घेत बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. राज्याचा निकाल 91.25 टक्के टक्के लागला आहे. राज्यात कोकण विभाग अव्वल, अव्वल विभागाचा निकाल 96.01 % इतका लागला आहे. तर मुंबई विभागाचा निकाल सर्वात कमी 88.13% टक्के इतका लागला आहे.
निकालात यंदाही मुलींची बाजी
यंदाच्या वर्षाच्या निकालात ही मुलींनी बाजी मारली आहे. विद्यार्थिनींचा एकूण निकाल 93.73 टक्के तर विद्यार्थ्यांचा एकूण निकाल 89.14 टक्के इतका लागला आहे.
12th Result Declared: 'या' विभागानं पुन्हा दाखवलं आम्हीच हुशार; मायानगरी पडली मागे
.... म्हणून मुली अव्वल
मुली करतात अधिक वाचन
एका सर्वेक्षणानुसार, मुलींमध्ये वाचनाची आवड जास्त असते तर अनेक मुलांना वाचायला अजिबात आवडत नाही. म्हणूनच मुलांपेक्षा मुलींना ज्ञान कमी असते. तसंच या सर्वेक्षणानुसार, अर्ध्यापेक्षा अधिक मुली दिवसभरातुन किमान अर्धा तास वाचन करतात. याउलट एक तृतीयांशपेक्षा कमी मुलं इतका वेळ वाचन करतात.
नजरा घड्याळाच्या काट्यांवर; ऑनलाईन निकालासाठी अवघा 1 तास शिल्लक; इथे बघा वेगवान निकाल
मुलींचा अटेन्शन स्पॅन चांगला
कॅनडातील न्यू ब्रंसविक विद्यापीठातील मानसशास्त्रज्ञ डॅनियल व्हॉयर आणि सुसान व्हॉयर यांनी अनेक भिन्न प्रकाशित अभ्यासांतील डेटा एकत्र करून मेटा-विश्लेषणकेलंय त्यात असं म्हंटलं आहे की, मुली शाळेतील वर्गांमध्ये अधिक चांगल्या पद्धतीनं लक्ष केंद्रित करू शकतात म्हणूनच त्या अभ्यासात आणि परीक्षेत अव्वल येतात. तर याउलट मुलं अधिक लक्ष केंद्रित करू शकत नाहीत म्हणून परीक्षेत कमी पडतात.
Maharashtra HSC Result 2023 LIVE updates : कोकण अव्वल, तर तुमच्या विभागाची किती टक्केवारी? पाहा इथं
वाईट सवयी आणि ताण
संशोधकांना असंही आढळलं की मुलं त्यांचा मोकळा वेळ आभासी जगात घालवतात. ते दररोज मुलींच्या तुलने ऑनलाइन गेम खेळण्याची 17 टक्के अधिक शक्यता असते. ते इंटरनेटचा जास्त वापर करतात. तसंच त्यांना कुटूंबीयांकडून प्रोत्साहनही कमी मिळतं. याउलट मुली कुटुंबियांसह अधिक वेळ घालवतात. मुलींना कमी गुण मिळाले तर कुटूंबीयांकडून त्यांना चांगले गुण मिळवण्यासाठी प्रोत्साहन दिलं जातं.
एकूणच मुली या गोष्टीमुळे अव्वल असतात असं शास्त्रज्ञ म्हणतात. या बातमीतून मुलं किंवा मुली असा भेदभाव करण्याचा अजिबात हेतू नाही. मात्र योग्य तो अभ्यास केला आणि आपल्या पात्रतेनुसार अभयास केला तर कोणीही कुठेही कमी नाही.
असा बघा तुमचा ऑनलाईन निकाल
सुरुवातीला News18 लोकमत च्या करिअर section मधील कोणतीही लिंक ओपन करा.
यानंतर तुम्हाला बातमीच्या मध्ये एक बॉक्स दिसेल.
यात तुम्हाला तुमचा रोल नंबर टाकायचा आहे.
यानंतर तुम्हाला तुमचा क्लास म्हणजे दहावी की बारावी हे सिलेक्ट करायचं आहे.
यानंतर खाली देण्यात आलेल्या गणिताच्या कोड्याचं उत्तर द्यायचं आहे. यांनतर तुम्हाला तुमचा निकाल थेट वेगवान पद्धतीनं बघता येणार आहे.
यानंतर हा निकाल तुम्हाला सेव्हही करता येणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Breaking News, Exam result, HSC Result, Maharashtra Board Exam, Maharashtra News, State Board