मराठी बातम्या /बातम्या /करिअर /Maharashtra Board 12th Result Declared: 12वीच्या ऑनलाईन निकालासाठी अवघे काही मिनिटं शिल्लक; इथे बघा वेगवान निकाल

Maharashtra Board 12th Result Declared: 12वीच्या ऑनलाईन निकालासाठी अवघे काही मिनिटं शिल्लक; इथे बघा वेगवान निकाल

 इथे बघा वेगवान निकाल

इथे बघा वेगवान निकाल

Maharashtra Board 12th Result Declared: ऑनलाईन निकाल जाहीर होण्यासाठी आता फक्त काही मिनिटांचा वेळ उरला आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालक प्रचंड चिंतेत आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 25 मे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून 2023 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. दुपारी 2 वाजता पासून सर्व विद्यार्थ्यांना आपला निकाल ऑनलाईन पद्धतीने निकाल बघता येणार आहे. ऑनलाईन निकाल जाहीर झाल्यानंतर शिक्षण मंडळाकडून बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. शिक्षण मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, राज्याचा एकूण निकाल 91.25 टक्के इतका लागला आहे. पण आता विद्यार्थ्यांच्या नजरा घडाळ्याच्या काट्यांवर आहेत.

ऑनलाईन निकाल जाहीर होण्यासाठी आता फक्त काही मिनिटांचा वेळ उरला आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालक प्रचंड चिंतेत आहेत. यंदाचा निकाल नक्की कसा असेल? किती टक्केवारी असेल? आपला किंवा आपल्या पाल्यांना नक्की किती टक्के मिळतील असे अनेक प्रश्न विद्यार्थी आणि पालकांना पडले आहेत. सर्वात आधी आपल्याला निकाल बघता यावा म्हणून विद्यार्थी मोबाईल, लॅपटॉप आणि कम्प्युटर समोर बसले आहेत.

Maharashtra SSC Result 2023 LIVE updates : पाहा तुमच्या विभागाची किती टक्केवारी? पाहा इथं

यंदाचा महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा बारावीचा निकाल तुम्हाला सर्वात आधी आणि सर्वांच्या पहिले बघायचा असेल तर तुम्हाला News18 लोकमतच्या ऑफिशिअल वेबसाईटवर आणि या बातमीमध्ये दिलेल्या चार्टमधे आपली माहिती भरून बघता येणार आहे.

असा बघा तुमचा ऑनलाईन निकाल

सुरुवातीला News18 लोकमत च्या करिअर section मधील कोणतीही लिंक ओपन करा.

यानंतर तुम्हाला बातमीच्या मध्ये एक बॉक्स दिसेल.

यात तुम्हाला तुमचा रोल नंबर टाकायचा आहे.

यानंतर तुम्हाला तुमचा क्लास म्हणजे दहावी की बारावी हे सिलेक्ट करायचं आहे.

यानंतर खाली देण्यात आलेल्या गणिताच्या कोड्याचं उत्तर द्यायचं आहे. यांनतर तुम्हाला तुमचा निकाल थेट वेगवान पद्धतीनं बघता येणार आहे.

यानंतर हा निकाल तुम्हाला सेव्हही करता येणार आहे.

Maharashtra Board 12th Result 2023: राज्याचा एकूण निकाल इतके टक्के; जाणून घ्या निकालाची काही मोठी वैशिष्ट्ये

कोणत्या विभागाचा किती टक्के निकाल

विभाग निकाल 2023निकाल 2022
पुणे  93.34 टक्के93.61%
नागपूर  90.35 टक्के96.52%
कोकण  96.01 टक्के97.21%
मुंबई  88.13 टक्के90.91%
कोल्हापूर  93.28 टक्के95.07%
अमरावती  92.75 टक्के96.34 %
नाशिक  91.66 टक्के95.03%
छ. संभाजी नगर  91.85 टक्के94.97%
लातूर  90.37 टक्के95.25%

काय होता गेल्या वर्षीचा निकाल

गेल्या वर्षी 14 लाख 39 हजार 731 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली त्यापैकी 13,56,604 विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. गेल्या वर्षी विशेष मूल्यांकन पद्धतीनं लावण्यात आलेला राज्याचा बारावीचा एकूण निकाल 94.22% इतका होता. तर यात बारावी विज्ञान विभागाचा निकाल 98.30 % इतका होता तर बारावी वाणिज्य विभागाचा निकाल 91.71 % होता. तसंच बारावी कला विभागाचा निकाल 90.51 % इतका होता.

First published:
top videos

    Tags: Career, Exam result, HSC Result, State Board