मुंबई, 25 मे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून 2023 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर होत आहे. दुपारी 2 वाजता सर्व विद्यार्थ्यांना आपला निकाल ऑनलाईन पद्धतीने पाहता येणार आहे. ऑनलाईन निकाल जाहीर होण्यापूर्वी शिक्षण मंडळाकडून बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. शिक्षण मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, राज्याचा एकूण निकाल ९१.२५ टक्के इतका लागला आहे.
News18लोकमत आणि महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या (Maharashtra board result) वेबसाईटवर हा निकाल विद्यार्थ्यांना लाईव्ह बघता येणार आहे. पण त्या आधी निकाल किती टक्के लागला? कोणत्या विभागाचा निकाल किती टक्के लागला? आणि तसंच काही होती या निकालाची मोठी वैशिष्ट्ये हे जाणून घेऊया.
महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणारी बारावीची परीक्षा यंदा 21 फेब्रुवारीपासून सुरू झाली होती. यंदा राज्यभरातून तब्बल १14 लाख 57,293 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. परीक्षार्थींमध्ये 7 लाख 92,780 विद्यार्थी तर 6 लाख 64,411 विद्यार्थिनी आहेत. 9 विभागीय मंडळांत एकूण 3115 केंद्रांवर परीक्षेसाठी 3 लाख 21,396 कर्मचारी कार्यरत होते. तसेच परीक्षेसाठी 10 मिनिटांचा अतिरिक्त वेळ मिळाला होता.
Maharashtra Board 12th Result 2023: अखेर प्रतीक्षा संपली; निकाल जाहीर; इतके टक्के लागला 12वीचा निकाल
निकालाची काही मोठी वैशिष्ट्ये
निकाल ऑनलाईन जाहीर होण्यापूर्वी शिक्षण मंडळाकडून पत्रकार परिषद घेण्यात आली. बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषद घेत बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. राज्याचा निकाल 91.25 टक्के टक्के लागला आहे.
राज्यात कोकण विभाग अव्वल, अव्वल विभागाचा निकाल 96.01 % इतका लागला आहे.
मुंबई विभागाचा निकाल सर्वात कमी 88.13% टक्के इतका लागला आहे.
निकालात यंदाही मुलींची बाजी
यंदाच्या वर्षाच्या निकालात ही मुलींची बाजी..विद्यार्थिनींचा एकूण निकाल93.73 टक्के तर विद्यार्थ्यांचा एकूण निकाल 89.14 टक्के इतका लागला आहे.
23 विषयांचा निकाल 100 %
एकूण 154 विषयांपैकी 23 विषयांचा निकाल 100 टक्के इतका लागला आहे.
विज्ञान शाखेचा निकाल सर्वाधिक
विज्ञान शाखेचा राज्याचा 96.09 टक्के इतका बंपर निकाल लागला आहे. कला शाखेचा राज्याचा निकाल 84.05 टक्के इतका निकाल लागला आहे. तर वाणिज्य विभागाचा निकाल 84.05 टक्के लागला आहे.
काय होता गेल्या वर्षीचा निकाल
गेल्या वर्षी 14 लाख 39 हजार 731 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली त्यापैकी 13,56,604 विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. गेल्या वर्षी विशेष मूल्यांकन पद्धतीनं लावण्यात आलेला राज्याचा बारावीचा एकूण निकाल 94.22% इतका होता. तर यात बारावी विज्ञान विभागाचा निकाल 98.30 % इतका होता तर बारावी वाणिज्य विभागाचा निकाल 91.71 % होता. तसंच बारावी कला विभागाचा निकाल 90.51 % इतका होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Career, Exam result, HSC Result, Maharashtra Board Exam, State Board