मुंबई, 25 मे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून 2023 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. दुपारी 2 वाजता पासून सर्व विद्यार्थ्यांना आपला निकाल ऑनलाईन पद्धतीने निकाल बघत आहेत. ऑनलाईन निकाल जाहीर झाल्यानंतर शिक्षण मंडळाकडून बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. शिक्षण मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, राज्याचा एकूण निकाल 91.25 टक्के इतका लागला आहे. पण यंदाच्या निकालात कोणत्या विभागानं बाजी मारली आहे. आणि कोणत्या विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे. जाणून घेऊया. कोणत्या विभागाचा किती टक्के निकाल
विभाग | निकाल 2023 | निकाल 2022 |
---|---|---|
पुणे | 93.34 टक्के | 93.61% |
नागपूर | 90.35 टक्के | 96.52% |
कोकण | 96.01 टक्के | 97.21% |
मुंबई | 88.13 टक्के | 90.91% |
कोल्हापूर | 93.28 टक्के | 95.07% |
अमरावती | 92.75 टक्के | 96.34 % |
नाशिक | 91.66 टक्के | 95.03% |
छ. संभाजी नगर | 91.85 टक्के | 94.97% |
लातूर | 90.37 टक्के | 95.25% |
Maharashtra Board 12th Result : यंदाही बारावीच्या निकालात मुलींची बाजी निकालाची काही वैशिट्ये निकाल ऑनलाईन जाहीर होण्यापूर्वी शिक्षण मंडळाकडून पत्रकार परिषद घेण्यात आली. बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषद घेत बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. राज्याचा निकाल 91.25 टक्के टक्के लागला आहे. राज्यात कोकण विभाग अव्वल, अव्वल विभागाचा निकाल 96.01 % इतका लागला आहे. Maharashtra Board 12th Result 2023: राज्याचा एकूण निकाल इतके टक्के; जाणून घ्या निकालाची काही मोठी वैशिष्ट्ये मुंबई विभागाचा निकाल सर्वात कमी 88.13% टक्के इतका लागला आहे. निकालात यंदाही मुलींची बाजी यंदाच्या वर्षाच्या निकालात ही मुलींची बाजी..विद्यार्थिनींचा एकूण निकाल93.73 टक्के तर विद्यार्थ्यांचा एकूण निकाल 89.14 टक्के इतका लागला आहे. 23 विषयांचा निकाल 100 % एकूण 154 विषयांपैकी 23 विषयांचा निकाल 100 टक्के इतका लागला आहे.
विज्ञान शाखेचा निकाल सर्वाधिक विज्ञान शाखेचा राज्याचा 96.09 टक्के इतका बंपर निकाल लागला आहे. कला शाखेचा राज्याचा निकाल 84.05 टक्के इतका निकाल लागला आहे. तर वाणिज्य विभागाचा निकाल 84.05 टक्के लागला आहे. काय होता गेल्या वर्षीचा निकाल गेल्या वर्षी 14 लाख 39 हजार 731 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली त्यापैकी 13,56,604 विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. गेल्या वर्षी विशेष मूल्यांकन पद्धतीनं लावण्यात आलेला राज्याचा बारावीचा एकूण निकाल 94.22% इतका होता. तर यात बारावी विज्ञान विभागाचा निकाल 98.30 % इतका होता तर बारावी वाणिज्य विभागाचा निकाल 91.71 % होता. तसंच बारावी कला विभागाचा निकाल 90.51 % इतका होता.