Maharashtra HSC Result 2023 LIVE updates : रोल नंबर आणि आईचं नाव टाका आणि पाहा बारावीचा निकाल

MSBSHSE Class 12th result 2023 | महाराष्ट्र बोर्ड 12वी निकाल 2023 Live updates :महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून 2023 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. न्यूज18 लोकमतच्या साईटवर तुम्हाला निकाल पाहता येईल.

 • News18 Lokmat
 • | May 25, 2023, 14:40 IST |  Mumbai, India
  LAST UPDATED 7 DAYS AGO

  हाइलाइट्स

  14:42 (IST)
  14:35 (IST)

  बारावीचा निकाल असा पाहू शकता

  या पेजवर गेल्यानंतर तुमचा सीट नंबर टाका आणि 12 सलेक्ट करा

  त्यानंतर आईचं नाव टाका आणि समोर दिलेल्या 2 आकड्यांची बेरीज किती याचे उत्तर द्या... आणि सबमिट करा..निकाल जाहीर होईल. 


  14:24 (IST)

  या परीक्षेसाठी राज्यातील पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या 9 विभागीय मंडळांमधून विज्ञान, कला, वाणिज्य आणि व्यवसाय अभ्यासक्रम या शाखेमधील 1428197 नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. 

  14:24 (IST)

  News 18 लोकमत थेट बघता येईल निकाल

  बारावीचा निकाल तुम्ही News 18 लोकमतच्या ऑफिशिअल वेबसाईटवर थेट बघू शकणार आहात. त्यामुळे निकालाच्या वेबसाईटच सर्व्हर डाऊन असेल तरी तुम्हाला तुमचा निकाल बघता येणार आहे.

  14:12 (IST)

  बारावीचा निकाल जाहीर

  कोकणाने मारली बाजी तर मुंबईचा सर्वात कमी निकाल

  विभागवार निकाल 👇👇

  कोकण - 96.01%

  नागपूर - 90.35%

  छ.संभाजी नगर - 91.85%

  मुंबई - 88.13%

  कोल्हापूर - 93.28%

  अमरावती - 92.75%

  नाशिक - 91.66%

  लातूर - 90.37%

  पुणे - 93.34%

  14:10 (IST)

  बारावी बोर्डाचा ऑनलाईन निकाल जाहीर करण्यात आला आहे. इथे आम्ही तुम्हाला डायरेक्ट लिंक देत आहोत. इथे तुमचा रोल नंबर भरा आणि तुमचा रिझल्ट बघा.


  14:3 (IST)

  बारावीचा ऑनलाईन निकाल जाहीर झाला आहे. इथं पाहा https://lokmat.news18.com/news/career/board-results-maharashtra-board/


  13:29 (IST)

  सर्व विभागांमध्ये मुलींचा निकाल सर्वाधिक लागला आहे. 93.73 टक्के लागला आहे. तर मुलांची टक्केवारी 89.14 टक्के आहे.

  महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून 2023 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. न्यूज18 लोकमतच्या साईटवर तुम्हाला निकाल पाहता येईल.  ऑनलाईन निकाल जाहीर होण्यापूर्वी शिक्षण मंडळाकडून बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. शिक्षण मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, राज्याचा एकूण निकाल 91.25 टक्के इतका लागला आहे. याशिवाय SMS द्वारे देखील तुम्ही हा निकाल पाहू शकणार आहात. या निकालाचे सर्व अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. प्रत्येक क्षणाचे अपड्टेस् पाहण्यासाठी इथे क्लिक करा.