Home /News /blog-space /

BLOG : 'या' कारणांमुळे शरद पवारांनी बदलली भूमिका!

BLOG : 'या' कारणांमुळे शरद पवारांनी बदलली भूमिका!

महाराष्ट्राच्या राजकारणाची दशा, दिशा आणि भविष्य जर कोणाला खूप चांगल्या पद्धतीने कळतं तर अर्थातच शरद पवार यांना. वेळ आणि परिस्थितीनुसार राजकारण बदलणं हे सुद्धा शरद पवार यांना सहज शक्य असतं आणि काही वेळा त्यांनी असं करूनही दाखवलं आहे.

पुढे वाचा ...
यापुढे मी लोकसभा निवडणुक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. - शरद पवार कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर मी निवडणूक लढवणार आहे. माढ्यासाठी मला विजयदादांनी सुद्धा आग्रह केला. - शरद पवार एकाच कुटुंबादत्लाय किती जणांनी निवडणुक लढवायची. तरुणांना संधी दिली पाहीजे. मला विरोधकांचा पराऴर करण्यासाठी प्रचार करायचा आहे, त्यामुळे मी लोकसभेची निवडणूक लढणार नाही. - शरद पवार केवळ 3 ते 4 महिन्यातील शरद पवार यांची ही तीन विधानं. तसं तर शरद पवार जे बोलतात त्याच्या विरुद्ध करतात असा जाणाकार आणि विरोधकांचा होरा. महाराष्ट्राच्या राजकारणाची दशा, दिशा आणि भविष्य जर कोणाला खूप चांगल्या पद्धतीने कळतं तर अर्थातच शरद पवार यांना. वेळ आणि परिस्थितीनुसार राजकारण बदलणं हे सुद्धा शरद पवार यांना सहज शक्य असतं आणि काही वेळा त्यांनी असं करूनही दाखवलं आहे. सध्या राज्यात आणि केंद्रात सगळ्या विरोधकांना बरोबर घेऊन जाण्याची क्षमता असलेला नेता म्हणूनही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे पाहिलं जातं.  पण तीन महिन्यात अशी काय स्थिती बदलली की शरद पवार यांना घेतलेली भूमिका दोन वेळा बदलावी लागली. VIDEO : राज ठाकरेंची शरद पवारांसोबत जवळीक? गडकरी म्हणतात... माढ्यातले राष्ट्रवादीचे खासदार विजयसिंह मोहिते पाटील हे मनापासून राष्ट्रवादीचे फारसे कधी नव्हते असं सोलापूरमध्ये बोललं जातं. असं असलं तरीही यावेळी पुन्हा एकदा विजयदादा लोकसभेच्या जागेसाठी आग्रही होते. पण माढाच्या लोकसभेच्या ऐवजी तुम्हाला राज्यसभेची जागा देतो असा प्रस्ताव राष्ट्रवादीच्यावतीने देण्यात आला होता असं बोललं जातं. पण लोकांना मात्र असं आवर्जून सांगण्यात आलं की, विजयदादांनीच शरद पवार यांना माढ्यासाठी गळ घातली.

SPECIAL REPORT : माढ्याचा तिढा, कोण उचलणार विडा?

पण निवडणूक लढवणार नाही असं म्हणणारे पवार जेंव्हा माढ्यातून लढणार असं स्पष्ट झालं त्याचवेळी माढ्यात, 'माढा, पवारांना पाडा' अश्या प्रकारचे संदेश सोशल मीडियातून फिरू लागले होते. यासह ज्यावेळी शरद पवार यांनी माढ्याचं नेतृत्व केलं होतं त्या 2009 त्यावेळी माढावासियांना दिलेली आश्वासनं ही पूर्ण झाली नाहीत. याबद्दलही लोकांच्या मनात पवार यांच्याबद्दल काही प्रमाणात नाराजी आहे. विजयसिह मोहिते पाटील यांना मानणारा जो माढ्यातला मोठा वर्ग आहे तो मोहिते पाटलांच्याशिवाय दुसऱ्या कोणाला स्विकारेल असं दिसत नाही. कारण मोहिते-पाटील भाजपा सोबत असतांना हा सगळा मतदार त्यांच्याबरोबर भाजपाकडे गेला होता. दरम्यानच्या काळात काही दिवसांपूर्वी स्वतः शरद पवार माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांना घेऊन माढाचा दौरा केला होता. तसंच देशमुख यांना तयारी करण्यासाठी सुद्धा सांगण्यात आलं होतं असं सूत्रांचं म्हणणं आहे.

शरद पवार को गुस्सा क्यों आता है!

आणखी काही खास कारणं अर्थात शरद पवार यांच्या माढामधून माघार घेण्याची कारणं इथेच संपत नाहीत. माढा मतदारसंघाचा विचार केला तर वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून राज्याच्या विविध भागात, प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रातसुद्धा तयार केलेला एक प्रवाह आपल्याला अडचणींमध्ये भर घालू शकतो असाही पवार यांचा कयास असावा. एक दबक्या आवाजातली चर्चा सुद्धा महत्वाची आहे. ती म्हणजे, पवार यांच्या कुटुंबीयांचा प्रामुख्याने अजितदादा पवार यांच्या पार्थ यांच्यासाठी फार आग्रह होता. जर का पार्थ यांना उमेदवारी दिली तर पवार कुटुंबातले तिघे लोकसभेसाठी उभे राहणार. अशा परिस्थितीत घराणेशाहीच्या आरोपांना उत्तर देणं शरद पवार यांना कठीण जाणार होतं. शिवाय काही जणांचा असा दावा आहे, अजित पवार पार्थला उमेदवारी न देण्याच्या शरद पवार यांच्या भूमिकेमुळे बंडाच्या पवित्र्यात होते. जर सुप्रिया सुळे दिल्लीत आणि अजित पवार राज्यात असं पवार यांचं नियोजन असेल तर पुढे कसं होणार असाही विचार त्यात असून शकतो. काहा दिवसांपूर्वी स्वतः शरद पवार यांनीच 'पार्थ पवार उमेदवार नाहीत, रोहित पवार उमेदवार नाहीत, शरद पवार उमेदवार आहेत', असं म्हटतं होतं, हे सुद्धा लक्षात घेण्यासारखं आहे. शरद पवार VS बाळासाहेब विखे पाटील : 1991 च्या निवडणुकीत काय घडलं होतं ? काय होते मागच्या वेळचे आकडे गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत जिथ देशात मोदी यांची लाट होती. त्यावेळी माढा लोकसभेची जागा मात्र राष्ट्रवादीने राखली होती. तर विजयसिंह मोहिते-पाटील निवडून आले होते. पण आपण जर आकड्यांवर नजर टाकली तर आपल्याला काही गोष्टी लक्षात येतील. 2014 च्या निवडणुकीत विजयसिंह मोहीत पाटील यांना     3,75,625 मतं मिळाली होती तर त्यांचं प्रतिस्पर्धी तत्कालीन शेतकरी संघटनेचे नेते आणि सध्या भाजपावासी झालेले राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना 3,39,741 मतं मिळाली होती. म्हणजे केवळ 37 हजार मतांनी विजय झाला होता. आता हा 37 हजारांचा आकडा पार करणं पवार यांना फार अवघड नाही. पण सध्याच्या मोहिते-पाटील, आंबेडकर यांच्यासह विविध छुप्या मुद्यांमुळे वाटतं तेवढं सोप्पही नाही एवढं मात्र नक्की.

मावळमधून राष्ट्रवादीचा उदय होणार?; अशी आहेत राजकीय समीकरणे

पवार यांनी माघार घेणं किंवा त्याचा पराभव करण्यासाठी सगळ्या घटकांनी एकत्र येणं ही महाराष्ट्राच्या एकूण परंपरेला आणि वैचारिक वाटचालीसाठी चांगली बाब नसल्याचं काही विचारवंतांना वाटतं. तर टीम जिंकण्याची 100 टक्के खात्री असते तेंव्हा स्वतः कप्तान मैदानात उतरत नाही, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस पवार यांच्या निर्णयाचं समर्थन करत आहे. शरद पवार काहीही करू शकतात किंवा आपला निर्णय बदलू शकतात असं मानणारा सुद्धा एक वर्ग महाराष्ट्रात आहे. अशा वर्गाला तर पवार अर्ज भरण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत निर्णय बदलू शकतात असं वाटतं.

नाशिकमध्ये भुजबळांना पवारांचं 'बळ'

एक वेगळा मुद्दा असा की, राज्यात बहुमतापासून थोड्याशा दूर असणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला याच शरद पवार आणि त्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसने बाहेरून पाठींबा देऊन सरकार वाचवलं होतं. कदाचित याचा पश्चाताप राष्ट्रवादी किंवा पवार यांना होत नसेल ना? पण या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसच्या या तंबूच्या एकमेव खांबाला तो हलण्या इतका धक्का लागलाय का याचा विचार व्हायला हवा. एका वेगळ्या अर्थाने 'कुटुंब', पक्ष, पक्षातला दादा गट या सगळ्यांपुढे पवार यांना माघार घ्यावी लागली का ? का वेगळ्या अर्थाने हा 'बदलत्या पुरोगामी विचारां'चा विजय झाला ? हा मुद्दा सगळ्यात महत्वाचा पत्रकारांशी बोलतांना स्वतः शरद पवार यांनी सांगितलेली एक बाब अतिशय महत्त्वाची आहे, 'आम्ही कुटुंबाने ठरवलं की, आतात नव्या पिढीला संधी दिली पाहिजे. म्हणून मी निवडणूक लढवणार नाही.' आता यावर राष्ट्रवादीच्या नेत्यांकडे उत्तर नाही. ते आपले पवार साहेबांचा निर्णय कसा योग्य आहे. हे विविध मुद्यांच्या आधारे सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. पण पवार यांच्या माघारीमुळे भाजप आणि राष्ट्रवादीच्या विरोधकांना मात्र अनेक प्रश्न विचारण्याची आयती संधी मिळाली आहे हे मात्र नक्की. (ब्लॉगमध्ये व्यक्त झालेली मत हे लेखकाचे वयक्तिक मत आहेत. 'त्याच्याशी न्यूज18 लोकमत' सहमत असेलत असं नाही. ) ==============
First published:

Tags: BJP, Congress, NCP, Sharad pawar

पुढील बातम्या