नवी दिल्ली, 1 नोव्हेंबर : भारतीय ऑटोमोबाइल्स मार्केटमध्ये अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या कारगाड्या उपलब्ध आहेत. प्रत्येक कारमध्ये असलेले फीचर्स आणि तिची मार्केटमध्ये असलेली ओळख ही वेगळी असते. परंतु आता होंडा कंपनीची Honda Brio 1.2 E MT I VTEC ही कार केवळ 2.78 लाख रूपयांमध्ये (Honda Brio 1.2 E MT I VTEC Honda cars price just Rs 2.78 lakh) पाच लोकांना प्रवास करता येईल अशी कार Cars 24 या वेबसाईटवर विक्रीसाठी ठेवण्यात आली आहे.
तशी तर या (Honda Brio 1.2 E MT I VTEC) कारची खरी किंमत ही 4.78 लाख रूपये आहे परंतु Cars 24 या वेबसाईटवर ही कार 2.78 लाख रूपयांमध्ये मिळत आहे. त्यामुळं आता कमीत कमी बजेटमध्ये चांगल्या फीचर्सची कार ग्राहकांना उपलब्ध होणार आहे. या वेबसाईटवर लिस्टेड ही (honda brio 1.2 e mt price) सेकंड हँडेड कार आहे. सिल्वर कलरमध्ये असलेल्या या कारला झीरो डाऊन पेमेंटवरही खरेदी करता येईल.
काय आहेत या कारमधील फीचर्स?
Honda कंपनीच्या Brio 1.2 E MT I VTEC या कारमध्ये 1198 सीसी चं इंजिन देण्यात आलं आहे. 'कार देखो' या वेबसाईटच्यानुसार ही कार 18.5 किलोमीटर प्रति लीटर (honda brio 2021 price) मायलेज देऊ शकते. पेट्रोलवर चालणाऱ्या या कारमध्ये 4 सिलेंडरही देण्यात आले आहेत. त्याचबरोबर या कारमध्ये 35 लीटरचा फ्यूल टँक देण्यात आला आहे.
त्याचबरोबर या कारसोबत ऑक्टोबर 2022 पर्यंतचा Insurance देण्यात आला आहे. यात असलेल्या ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल सिस्टममुळं ही कार इतर कारपेक्षा वेगळी ठरते. Cars 24 या वेबसाईटवर लिस्टेड ही कार 2012 सालचा मॉडेल असून ती आतापर्यंत 27 हजार किलोमीटर पर्यंत चाललेली आहे.
वेबसाईटवर लिस्टेड केलेली कार ही दिल्लीतील (DL-13) आरटीओ ऑफिसमध्ये रजिस्टर्ड केलेली आहे. त्यामुळं आता अशा कार खरेदी करताना त्यावरील अटी आणि शर्तींना नीट तपासून घ्यायला हवं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.