ज्या बँकेतून कर्ज घ्यायचं आहे आणि जे बँक खातं तुमच्या नावे आहे, ते मोबाईल अॅप डाउनलोड करा किंवा त्या बँकेच्या पोर्टलवर जा.
बँकेच्या वेबसाईट किंवा अॅपद्वारे लॉगइन करावं लागेल. इथे Loan चा पर्याय दिसेल. त्यात Personal Loan वर क्लिक करावं लागेल.
इथे तुम्ही कर्ज घेण्यासाठी पात्र आहात का, ते तपासता येईल. पात्रता ठरल्यानंतर Apply Now वर क्लिक करा.
आता ऑनलाईन अॅप्लिकेशन भरण्याबाबत सांगितलं जाईल. यात पर्सनल, रोजगारसंबंधी आणि व्यवसायाबाबत माहिती मागितली जाईल.
त्यानंतर बँकेचे कर्मचारी फोन करुन तुमच्या डिटेल्सचं वेरिफिकेशन करतील. तसंच आधार कार्डची एक कॉपी अपलोड करण्यासाठी सांगितलं जाईल.
त्यानंतर बँकेकडून तुमची आणि आधारची माहिती वेरिफाय केली जाईल आणि खात्यात पैसे ट्रान्सफर केले जातील.
ही सुविधा घेण्यासाठी कमीत-कमी 23 आणि जास्तीत-जास्त 60 वर्ष वय असावं लागतं. अर्ज करणारा व्यक्ती भारतीय नागरिक असणं गरजेचं असून तो एखाद्या सरकारी, खासगी किंवा मल्टीनॅशनल कंपनीत काम करणार असावा. कर्ज घेण्यासाठी तुमचा आधीचा क्रेडिट स्कोर योग्य असावा. तसंच किमान मासिक उत्पन्नाची मर्यादा निश्नित करण्यात आली आहे, ती अर्जदाराला पूर्ण करावी लागेल.