Home /News /auto-and-tech /

केवळ 23 हजार रुपयांत मिळतेय Honda Activa Scooter, चांगल्या मायलेजसह मिळतील जबरदस्त फीचर्स

केवळ 23 हजार रुपयांत मिळतेय Honda Activa Scooter, चांगल्या मायलेजसह मिळतील जबरदस्त फीचर्स

सध्या बाजारातील टू-व्हिलरच्या किंमती 60 हजार रुपयांहून अधिक आहेत. परंतु एका खास डीलमध्ये Honda Activa Scooter केवळ 23000 रुपयांत खरेदी करता येऊ शकते.

  नवी दिल्ली, 9 डिसेंबर : भारतात टू-व्हिलर सेगमेंटचं मोठं मार्केट आहे. टू-व्हिलरमध्ये अनेक पर्यायही उपलब्ध आहेत. सध्या बाजारातील टू-व्हिलरच्या किंमती 60 हजार रुपयांहून अधिक आहेत. परंतु एका खास डीलमध्ये Honda Activa Scooter केवळ 23000 रुपयांत खरेदी करता येऊ शकते. Honda Activa पॉप्युलर स्कूटर असून चांगल्या मायलेजसह यात जबरदस्त फीचर्स मिळतात. स्कूटरमध्ये सामान ठेवण्यासाठी चांगला बूट स्पेसही या स्कूटरमध्ये मिळतो. Honda Activa वर मिळणारी डील सेकंड हँड स्कूटरवर आहे. ही स्कूटर ड्रूम नावाच्या वेबसाइटवर लिस्टेड आहे. वेबसाइटवर अपलोड केलेल्या फोटोवरुन स्कूटर चांगल्या कंडिशनमध्ये असल्याचं समजतं. ही स्कूटर केवळ 28 हजार किलोमीटरपर्यंत चालली आहे.

  2 लाख रुपयांहून कमी किंमतीत मिळतेय Maruti Wagon R, पाहा डिटेल्स

  Honda Activa 110 हे 2013 सालातील मॉडेल आहे. ही स्कूटर दिल्लीच्या DL 75 आरटीओमध्ये रजिस्टर्ड आहे. या स्कूटरमध्ये 109 cc चं इंजिन देण्यात आलं असून 55 kmpl मायलेज देते. त्याशिवाय यात 5 लीटर फ्यूल टँकही मिळेल. ही स्कूटर 7500 rpm वर 8 bhp पॉवर देते, तर 5500 rpm वर 9 nm टॉर्कवर चालेल.

  ...तर नव्या कार खरेदीवर मिळेल बंपर सूट, रजिस्ट्रेशन फीदेखील होईल माफ

  कंपनी या स्कूटरवर बुकिंगचाही पर्याय देते, त्यासाठी युजर्सला केवळ 499 रुपये द्यावे लागतील.

  केवळ 30000 रुपयांत खरेदी करा Honda Activa, पाहा डिटेल्स

  सध्या बाजारात ब्रँड न्यू Honda Activa 110 cc ची एक्स शोरुम किंमत 64 हजार रुपयांपासून 65964 रुपये आहे. ही स्कूटर अनेक वर्षांपासून बाजारात असून आतापर्यंत याचे अनेक अपडेटेड वर्जन समोर आले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे कोणतीही सेकंड हँड स्कूटर खरेदी करताना आधी त्याची संपूर्ण माहिती तपासा, इतर अटी-नियम तपासून, त्यानंतरच पुढील डील करा.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Scooter ride

  पुढील बातम्या