जाहिरात
मराठी बातम्या / ऑटो अँड टेक / ...तर नव्या कार खरेदीवर मिळेल बंपर सूट, रजिस्ट्रेशन फीदेखील होईल माफ

...तर नव्या कार खरेदीवर मिळेल बंपर सूट, रजिस्ट्रेशन फीदेखील होईल माफ

...तर नव्या कार खरेदीवर मिळेल बंपर सूट, रजिस्ट्रेशन फीदेखील होईल माफ

जर तुम्ही जुनं वाहन स्क्रॅप करत असाल, तर त्याचं सर्टिफिकेट दाखवल्यानंतर नवी कार खरेदी करताना ग्राहकांना 5 टक्के सूट मिळेल.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 27 नोव्हेंबर : मागील अनेक दिवसांपासून वाहनांच्या स्क्रॅपिंग पॉलिसीवर काम सुरू आहे. सरकारकडून Vehicle Scrapping हे धोरणही लागू करण्यात आलं आहे. या धोरणांतर्गत 10 वर्ष जुन्या डिझेल कार आणि 15 वर्ष जुन्या पेट्रोल कार स्क्रॅप करण्याचा नियम करण्यात आला आहे, जो वाहनांच्या फिटनेसवर अवलंबून आहे. या 10 आणि 15 वर्षांच्या कालावधीनंतरही वाहन मालक गाडीचा वापर करू इच्छित असल्यास, त्यांना वाहनाचं फिटनेस सर्टिफिकेट बनवावं लागेल. जर या फिटनेस टेस्टमध्ये वाहन फेल झालं, तर ते स्क्रॅप केलं जाईल. नव्या कार खरेदीवर 5 टक्के सूट - जर तुम्ही जुनं वाहन स्क्रॅप करत असाल, तर त्याचं सर्टिफिकेट दाखवल्यानंतर नवी कार खरेदी करताना ग्राहकांना 5 टक्के सूट मिळेल. जर तुम्ही 5 लाख रुपयांची कार खरेदी करत असाल, तर त्यावर तुम्हाला 5 टक्क्यांच्या हिशोबाने 25000 रुपयांची सूट मिळेल. त्याशिवाय नव्या वाहनाचं रजिस्ट्रेशनही माफ केलं जाईल, जे जवळपास 50000 रुपयांपर्यंत असतं.

Maruti Suzuki ची मोठी घोषणा, डिझेल Car ची निर्मिती बंद करणार; वाचा काय आहे कारण

म्हणजेच 5 लाखांची कार खरेदी केल्यावर आणि स्क्रॅप सर्टिफिकेट जर असेल, तर नव्या गाडीवर एकूण 75000 रुपयांचा फायदा होऊ शकतो.

6 लाखांहून स्वस्त असणाऱ्या या SUV ची भारतात क्रेझ, वर्षभरात 30000 Car ची विक्री

दरम्यान, प्रदूषण पसरवणाऱ्या गाड्यांवर लगाम लावण्यासाठी सरकारकडून महत्त्वपूर्ण पावलं उचचली जात आहेत. जर जुन्या वाहनाच्या मर्यादित कालावधीनंतर पुन्हा गाडीची फिटनेस टेस्ट करायची असल्यास त्यासाठी शुल्क वाढण्यात येणार आहे. मारुति सुझुकी आणि टोयोटाने भारतातील पहिलं व्हीकल स्क्रॅपिंग यार्ड सुरू केलं आहे. हे स्क्रॅपिंग सेंटर 10,993 चौरस मीटरवर पसरलेलं आहे. हे बनवण्यासाठी कंपनीने 44 कोटींची गुंतवणूक केली आहे. जर तुम्हीही जुनी पेट्रोल-डिझेल गाडी स्क्रॅप केली, तर नव्या वाहनावर मोठा डिस्काउंट मिळवू शकता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: car
  • First Published :
जाहिरात
जाहिरात