Home /News /auto-and-tech /

2 लाख रुपयांहून कमी किंमतीत मिळतेय Maruti Wagon R, पाहा डिटेल्स

2 लाख रुपयांहून कमी किंमतीत मिळतेय Maruti Wagon R, पाहा डिटेल्स

Maruti ची Wagon R कार पॉप्युलर आहे. सध्या या कारची किंमत 5.25 लाख रुपये आहे. परंतु एका खास डीलमध्ये ही कार 2 लाख रुपयांहून कमी किंमतीत खरेदी करता येईल.

  नवी दिल्ली, 6 डिसेंबर : Maruti ची Wagon R कार पॉप्युलर आहे. चांगल्या मायलेजसह लहान कुटुंबासाठी ही कार चांगला पर्याय आहे. सध्या या कारची किंमत 5.25 लाख रुपये आहे. परंतु एका खास डीलमध्ये ही कार 2 लाख रुपयांहून कमी किंमतीत खरेदी करता येईल. खास डीलमध्ये मिळणारं हे Maruti Wagon R VXI मॉडेल आहे. हे BS 4 इंजिनवर काम करतं. ही कार सिल्व्हर कलर वेरिएंटमध्ये येते. या कारला 998 cc इंजिन देण्यात आलं आहे, जे 67.1 बीएचपी पॉवर जनरेट करतं. यात एयरबॅगची सुविधाही देण्यात आली आहे.

  केवळ 30000 रुपयांत खरेदी करा Honda Activa, पाहा डिटेल्स

  डीलमध्ये मिळणारी ही कार 2011 सालातील पेट्रोल मॉडेल आहे. ही कार मॅन्युअली ट्रान्समिशनसह येते. हरियाणातील HR26 आरटीओमध्ये ही कार रजिस्टर्ड आहे. Maruti WagonR सेकंड हँड सेंगमेंट कार असून ही 1.11 लाख किलोमीटरपर्यंत चालली आहे. CarDekho वेबसाइटवर अपलोड केलेल्या फोटोनुसार, ही कार चांगल्या कंडिशनमध्ये असून फर्स्ट ओनर कार आहे.

  केवळ 1.93 लाखात मिळतेय Hyundai ची ही Car, पाहा डिटेल्स

  Maruti WagonR कार 1,99,000 रुपयात लिस्टेड आहे. वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार ही कार केवळ 5100 रुपये देऊन बुक करता येऊ शकते. वेबसाइटवर होम डिलीव्हरीचाही पर्याय आहे, जो अतिशय फायदेशीर ठरू शकतो.

  ...तर नव्या कार खरेदीवर मिळेल बंपर सूट, रजिस्ट्रेशन फीदेखील होईल माफ

  या सेकंड हँड कार खरेदीवर वॉरंटी आणि कॅशबॅकचा पर्यायही दिला जात आहे. त्यामुळे ही डील फायद्याची ठरू शकते. महत्त्वाची बाब म्हणजे कोणतीही सेकंड हँड कार खरेदी करताना आधी त्याची संपूर्ण माहिती तपासा, त्यानंतर पुढील डील करा.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Car, Maruti suzuki cars

  पुढील बातम्या