मराठी बातम्या /बातम्या /ऑटो अँड टेक /

Facebook वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी; login साठी करावं लागेल आता हे काम

Facebook वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी; login साठी करावं लागेल आता हे काम

मोबाइल युझर्ससाठीही (Smartphone Users) लागू असेल. आयओएस (iOS) आणि अँड्रॉइड (Android) अशा दोन्ही प्रकारच्या मोबाइलवर फेसबुक वापरणाऱ्या युझर्सना टू फॅक्टर ऑथेंटिकेशन अनिवार्य असेल.

मोबाइल युझर्ससाठीही (Smartphone Users) लागू असेल. आयओएस (iOS) आणि अँड्रॉइड (Android) अशा दोन्ही प्रकारच्या मोबाइलवर फेसबुक वापरणाऱ्या युझर्सना टू फॅक्टर ऑथेंटिकेशन अनिवार्य असेल.

मोबाइल युझर्ससाठीही (Smartphone Users) लागू असेल. आयओएस (iOS) आणि अँड्रॉइड (Android) अशा दोन्ही प्रकारच्या मोबाइलवर फेसबुक वापरणाऱ्या युझर्सना टू फॅक्टर ऑथेंटिकेशन अनिवार्य असेल.

मुंबई 19 मार्च: फेसबुकच्या एकूण युझर्सपैकी स्मार्टफोनवर फेसबुक (Facebook) वापरणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. स्मार्टफोनवर फेसबुक वापरणाऱ्या युझर्सकरिता फेसबुकने आता टू फॅक्टर ऑथेंटिकेशन (Two Factor Authentication) प्रक्रिया अनिवार्य केली आहे. अकाउंटच्या सुरक्षिततेच्या (Security) दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला असून, या निर्णयाची अंमलबजावणी तातडीने केली जाणार आहे. फेसबुकने टू फॅक्टर ऑथेंटिकेशन प्रक्रिया डेस्कटॉपवर लॉगिनसाठी अनिवार्य करण्याचा निर्णय 2017मध्ये घेतला होता. आता ती प्रक्रिया मोबाइल युझर्ससाठीही (Smartphone Users) लागू असेल. आयओएस (iOS) आणि अँड्रॉइड (Android) अशा दोन्ही प्रकारच्या मोबाइलवर फेसबुक वापरणाऱ्या युझर्सना टू फॅक्टर ऑथेंटिकेशन अनिवार्य असेल. त्यामुळे नेहमीपेक्षा वेगळ्या किंवा नव्या मोबाइलवरून तुम्ही लॉगिन करणार असाल, तर टू-फॅक्टर ऑथेंटिकेशनशिवाय अकाउंट लॉगिन होणार नाही. फेसबुक अकाउंट हॅक होण्याच्या घटना अलीकडे वाढल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर हे फीचर उपयुक्त ठरणार आहे.

टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन म्हणजे काय?

टू फॅक्टर ऑथेंटिकेशन हे एक सिक्युरिटी फीचर (Security Feature) अर्थात सुरक्षिततेसाठीची व्यवस्था आहे. तुम्ही नेहमी ज्या उपकरणावरून (मोबाइल, लॅपटॉप, टॅब किंवा डेस्कटॉप) तुमचं फेसबुक अकाउंट वापरता, त्यापेक्षा वेगळ्या उपकरणावरून तुमच्या फेसबुक अकाउंटला लॉगिन करण्याचा प्रयत्न झाला, की त्या वेळी लॉगिनसाठी केवळ पासवर्ड पुरेसा होत नाही. त्या वेळी ते अकाउंट तुम्हीच उघडत आहात, याची खात्री पटण्यासाठी तुमच्या रजिस्टर्ड नंबरवर एक एसएमएस पाठवला जातो किंवा तुमच्या नेहमीच्या उपकरणावर अलर्ट पाठवून ते तुम्हीच आहात का याची खात्री करण्यासाठी टॅप/क्लिक करायला सांगितलं जातं.

अवश्य पाहा - फक्त 2 मिनिटांत ओळखा तुम्हाला डायबेटिज आहे की नाही?

थोडक्यात सांगायचं झालं, तर तुमच्या अकाउंटचा पासवर्ड (Password) कोणाला कळला आणि त्या व्यक्तीने तुमच्या अकाउंटमध्ये लॉगिन करण्याचा प्रयत्न केला, तरी तो त्यात यशस्वी होऊ शकणार नाही. कारण तो वेगळ्या उपकरणावरून लॉगिन करणार असल्याने त्याचं नोटिफिकेशन किंवा एसएमएस तुम्ही फेसबुक नेहमी ज्या उपकरणावरून वापरता त्या नंबरवर/उपकरणावर येईल. पासवर्ड टाकलेला असला, तरी तो कोड टाकल्याशिवाय अकाउंट सुरू होऊ शकणार नाही. शिवाय कोणी तरी तुमचं अकाउंट उघडण्याचा प्रयत्न करत असेल, तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन लगेचच येईल. त्यामुळे तुम्ही लगेच पासवर्ड बदलू शकाल.

अवश्य पाहा - 'फेसबुक, गुगल सारख्या कंपन्यांनी माध्यम संस्थांना पत्रकारितेसाठी शुल्क देणारा कायदा करावा'

'आम्ही युझर्सच्या माहितीच्या सुरक्षिततेकडे लक्ष देतो. युझर्सची अकाउंट्स हॅकर्सकडून हॅक केली जाऊ नयेत, यासाठी आमचा प्लॅटफॉर्म सुरक्षित असावा, याकरिता आम्ही असे उपाय राबवतो,' असं फेसबुककडून सांगण्यात आलं आहे. दरम्यान, याच आठवड्याच्या सुरुवातीला ट्विटरने सिक्युरिटी फीचरचा उपयोग केवळ ऑथेंटिकेशन प्रक्रियेच्या रूपात केला जाणार असल्याची घोषणा केली होती. ट्विटरवरील प्रत्येक अकाउंटमध्ये अनेक सिक्युरिटी कीजची परवानगी दिली जाईल, असं ट्विटरने जाहीर केलं होतं.

First published:

Tags: Cyber crime, Facebook, Security alert, Smartphone, Tech news