Home /News /technology /

फक्त 2 मिनिटांत ओळखा तुम्हाला डायबेटिज आहे की नाही?

फक्त 2 मिनिटांत ओळखा तुम्हाला डायबेटिज आहे की नाही?

बरेचदा डोळ्यांची तपासणी न केल्यामुळे लोकांना डोळ्यांचा डायबेटिज (diabetes) असतानाही त्यांना त्याची जाणीव नसते.

मुंबई, 16 मार्च : जर कुणाला ब्लड प्रेशर, हृदयासंबंधी आजार आणि डायबेटिज असेल तर त्याचा डोळ्यांवर परिणाम होतो. डोळ्यांशी संबंधित डायबेटिज होते. डोळ्यांशी संबंधित डायबेटिस (Diabetes) एखाद्या रुग्णाला झालाय का हे तपासण्यासाठी डायबेटिक रेटिनोपॅथी (Diabetic Retinopathy - DR) हे तंत्र वापरतात पण हे तंत्र वापरणारे तज्ज्ञ भारतात कमी प्रमाणात आहेत. बरेचदा डोळ्यांची तपासणी न केल्यामुळे लोकांना डोळ्यांचा डायबेटिज असतानाही त्यांना त्याची जाणीव नसते. पण जेव्हा तो आजार गंभीर होतो तेव्हा त्यांना ते लक्षात येतं आणि वेळ निघून गेलेली असते. शंकरा आय फाउंडेशन अँड लेबेन केअर यांनी नेत्र (Netra) नावानी आर्टिफिशियल इंटिलिजन्सवर (Artificial Intelligence) आधारित यंत्र तयार केलं आहे जे अवघ्या काही मिनिटांतच डोळ्यातील डायबेटिस ओळखू शकतं. रेटिनावर उपचार करणारे डॉक्टर आणि डीप कॉन्व्होल्युशन न्यूरल नेटवर्कच्या (DCNN) शास्रज्ञांनी हे नेत्र तंत्रज्ञान विकसित केलं आहे. या एआय यंत्रणेत इंटेल झिऑन स्केलेबल प्रोसेसर, डीप लर्निंग बूस्ट आणि इंटेल अडव्हान्स्ड व्हेक्टर एक्सटेंशन 512 यांचा वापर केला आहे. हे तंत्रज्ञान डोळ्यांचा फोटो घेऊन क्लाउड बेस्ड वेब पोर्टलला (Cloud based Web portal) पाठवतं. तिथं एआय अल्गोरिदमच्या सहाय्याने रुग्णाच्या डोळ्यांच्या फोटोंचं ग्रेडिंग केलं जातं. त्यानंतर रुग्णाला डोळ्यांचा डायबेटिस झाला आहे का, डोळ्यांची क्षमता किती उरली आहे याची माहिती मिळते. नेत्र यंत्रणा रुग्णाचा डायबेटिक कोणत्या स्टेजला आहे हे पण सांगते त्यामुळे डॉक्टरांचं काम हलकं होतं. आजाराबद्दल डॉक्टरांना स्पष्टता आल्यानंतर ते योग्य उपचार करू शकतात. हे वाचा - दिवसभराच्या कष्टानंतर पाहिजे चांगली झोप? ही आहेत सिक्रेट्स, नक्की करा ट्राय आतापर्यंत या नेत्र (NETRA AI) तंत्रज्ञानाचा वापर करून भारतातील 3093 जणांचे डोळे तपासले असून त्यापैकी 742 जणांना डायबेटिस होण्याचा धोका असल्याचं लक्षात आलं. या तंत्रामुळे तुम्हाला दोन मिनिटांत तुमच्या डोळ्यांची परिस्थिती लक्षात येते. शंकरा आय फाउंडेशनमधील मेडिकल अडमिनिस्ट्रेशन क्वालिटी अँड एज्युकेशन विभागाचे प्रमुख डॉ. कौशिक मुरली म्हणाले, ‘रुग्णांना डोळ्यांच्या डायबेटिसबद्दल लवकर माहिती व्हावी आणि तो वेळ त्यांनी उपचारांसासाठी वापरावा म्हणून आम्ही हे तंत्रज्ञान विकसित केलं आहे.’ हे तंत्रज्ञान तयार करण्यासाठी अनेकांनी खूप कष्ट घेतले आहेत. त्यामुळे लेन्सच्या समोर व्यक्तीने डोळे ठेवले की दोन मिनिटांत त्याच्या डोळ्यांना डायबेटिस झाला आहे का हे लक्षात येतं. हे वाचा - एक Blood test वाचवू शकते कोरोना रुग्णांचा जीव; संशोधकांचा दावा डायबेटिस हा आजार आता भारतात मोठ्या प्रमाणात आढळतो. लँसेट डायबेटिस अँड एंडोक्रोनॉलॉजीने केलेल्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील अभ्यासानुसार भारतात 2030 मध्ये 9.80 कोटी लोकांना डायबेटिस झाला असेल. त्यामुळे हे तंत्रज्ञान खूपच फायदेशीर ठरणार आहे.
First published:

Tags: Diabetes, Health, Lifestyle, Mumbai, Technology, Wellness

पुढील बातम्या