जाहिरात
मराठी बातम्या / ऑटो अँड टेक / अपघातावेळी ABS सिस्टममुळे जीव वाचण्यास होते मदत, कसं काम करतं अँटीलॉक ब्रेकिंग सिस्टम?

अपघातावेळी ABS सिस्टममुळे जीव वाचण्यास होते मदत, कसं काम करतं अँटीलॉक ब्रेकिंग सिस्टम?

अपघातावेळी ABS सिस्टममुळे जीव वाचण्यास होते मदत, कसं काम करतं अँटीलॉक ब्रेकिंग सिस्टम?

आधुनिक तंत्रज्ञाच्या सर्वात चांगल्या उदाहराणांमध्ये ABS सामिल आहे. आतापर्यंत या सिस्टममुळे अनेक लोकांचा अपघातांमध्ये जीव वाचला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 5 फेब्रुवारी: भारतीय ऑटो इंडस्ट्रीमध्ये (Auto Industry) ABS अनिवार्य (ABS System) करण्यात आलं आहे. ABS अर्थात अँटीलॉक ब्रेकिंग सिस्टम. ABS चा शोध 1920 च्या दशकात लागला होता. त्यावेळी 1990 पर्यंत हे सिस्टम कारमध्ये प्रचलित होतं. आता जवळपास सर्वच कार्समध्ये हे फीचर येतं. हे ABS सिस्टम कसं काम करतं? काय असतं ABS? आधुनिक तंत्रज्ञाच्या सर्वात चांगल्या उदाहराणांमध्ये ABS सामिल आहे. आतापर्यंत या सिस्टममुळे अनेक लोकांचा अपघातांमध्ये जीव वाचला आहे. अँटीलॉक ब्रेक्स अर्थात ABS वेगात ब्रेक दाबल्यानंतर कारच्या चाकांना लॉक होण्यापासून वाचवतं. ABS मध्ये सेंसर्स असतात आणि ज्यावेळी व्हील जाम होतात, त्यावेळी काही वेळासाठी हे चाकावरील ब्रेक कमी करतो. यामुळे कार नियंत्रणात राहते आणि घसरत नाही.

हे वाचा -  तुमचंही E-Challan कापलं गेलं आहे का? अशाप्रकारे माहित करून घ्या

ABS काम करतंय की नाही हे कसं ओळखाल? जर तुमच्या कारचं ABS सिस्टम काम करत नसेल, तर ब्रेकमध्ये इतर समस्या असू शकतात. जर तुम्ही वेगात ब्रेक मारत असाल आणि कार थांबत नसेल तर ही धोक्याची घंटा असू शकते. अशा परिस्थितीत कार चालवू नका आणि मॅकेनिककडे दुरुस्त करा.

हे वाचा -  वर्षभरापूर्वी आलेला FASTag आता बंद होणार? पुन्हा बदलणार Toll Collection ची पद्धत

जर तुमच्या कारची ABS सिस्टम काम करत नसेल, तर कारच्या केबिनमध्ये ABS लाइट सुरू होते. तसंच वेगात ब्रेक लावल्यानंतर कार झटका देऊन थांबली किंवा घसरली तर ABS काम करत नसल्याचं ओळखावं. ब्रेक लावल्यानंतर विचित्र आवाज येत असल्यास, ब्रेक लावल्यानंतर अधिक ताकद लावावी लागत असेल तर कारच्या ABS सिस्टममध्ये बिघाड असल्याचं ओळखावं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात