मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /तुमचंही E-Challan कापलं गेलं आहे का? अशाप्रकारे माहित करून घ्या

तुमचंही E-Challan कापलं गेलं आहे का? अशाप्रकारे माहित करून घ्या

दंड पावती टाळण्यासाठी खरं तर नियमांचं पालन करणं (Follow Traffic Rules) हाच महत्त्वाचा उपाय आहे. पण काहीवेळेस नकळत नियमांचं उल्लंघन होतं. आपल्या गाडीची दंडाची पावती फाडली गेली आहे हे तेव्हा आपल्या लक्षात येत नाही

दंड पावती टाळण्यासाठी खरं तर नियमांचं पालन करणं (Follow Traffic Rules) हाच महत्त्वाचा उपाय आहे. पण काहीवेळेस नकळत नियमांचं उल्लंघन होतं. आपल्या गाडीची दंडाची पावती फाडली गेली आहे हे तेव्हा आपल्या लक्षात येत नाही

दंड पावती टाळण्यासाठी खरं तर नियमांचं पालन करणं (Follow Traffic Rules) हाच महत्त्वाचा उपाय आहे. पण काहीवेळेस नकळत नियमांचं उल्लंघन होतं. आपल्या गाडीची दंडाची पावती फाडली गेली आहे हे तेव्हा आपल्या लक्षात येत नाही

    मुंबई, 05 फेब्रुवारी: महानगर असो किंवा छोटं शहर...हल्ली सगळीकडे वाहनांची गर्दी वाढली आहे. वेळ वाचवण्यासाठी,सार्वजनिक वाहतुकीमधली गर्दी टाळण्यासाठी बहुतेकजण हल्ली स्वत:च्या वाहनांचाच वापर करणं पसंत करतात आणि त्यामुळेच रस्त्यांवरची गर्दी वाढली आहे. अनेकदा घाईमध्ये वाहतुकीच्या नियमांचं नकळत उल्लंघन होतं आणि मग दंडाची पावती (Challan) फाडली जाते. हल्ली तर आधुनिक तंत्रज्ञानामुळे आपल्या गाडीचं चलान कापलं गेलं आहे की नाही हे समजतच नाही. पण हीच गोष्ट समजावी यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे.

    दंड पावती टाळण्यासाठी खरं तर नियमांचं पालन करणं (Follow Traffic Rules) हाच महत्त्वाचा उपाय आहे. पण काहीवेळेस नकळत नियमांचं उल्लंघन होतं. आपल्या गाडीची दंडाची पावती फाडली गेली आहे हे तेव्हा आपल्या लक्षात येत नाही. एसएमएस आल्यावरच आपल्याला दंड झाल्याचं समजतं. E-Challan चं स्टेटस माहिती करुन घ्यायचं असेल तर सगळ्यांत आधी तुम्ही echallan.parivahan.gov.in या वेबसाईवर जा. या वेबसाईटवर चेक चलान स्टेटस (Check Challan Status) या पर्यायावर क्लिक करा.

    हे वाचा-वर्षभरापूर्वी आलेला FASTag आता बंद होणार? पुन्हा बदलणार Toll Collection ची पद्धत

    तुम्हाला स्क्रीनवर चलान नंबर, वाहन नंबर आणि ड्रायव्हिंग लायसन्स नंबर असे पर्याय दिसतील. तुम्ही वाहन नंबरच्या पर्यायावर क्लिक करा. आता तिथं तुमच्या वाहनाचा रजिस्ट्रेशन नंबर टाका. तिथं आलेला कॅप्चा कोड (Captcha Code) भरा. त्यानंतर “Get Detail ” या पर्यायावर क्लिक करा. या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या वाहनाचं चलान कापलं गेलं आहे की नाही हे लगेचच समजेल.

    काही वेळेस मात्र तुमची चूक नसतानाही दंड केला जातो. ट्रॅफिक पोलीस काही वेळेस चुकीची पावती करतात. तुम्हाला जर माहिती असेल की तुमची चूक नाही तरीही दंड झाला आहे तर अशा वेळेस काय करायचं? तुम्ही ट्रॅफिक सेलशी संपर्क करु शकता. तिथे संबंधित अधिकाऱ्यांपुढे तुम्ही तुमची बाजू मांडा. तुमची बाजू त्यांना पटली तर तुमचा दंड रद्द होऊ शकतो. दंड पावती फाडली आहे याचा अर्थ तुम्ही तुमची चूक नसतानाही ते भरलं पाहिजे असं नाही. कारण ट्रॅफिक पोलिसांची पावती म्हणजे कोर्टाचा आदेश नाही. पण त्याला कोर्टात आव्हान दिलं जाऊ शकतं. त्याविरोधात कोर्टात दाद मागितली जाऊ शकते. ट्रॅफिक पोलिसांनी तुमची चूक नसतानाही पावती फाडली असेल तर त्यावेळेस त्यांच्यासोबत वाद घालू नका. पण नंतर कोर्टात जाऊन त्याविरोधात दाद मागितलीत तर तुम्हाला न्याय मिळू शकतो. तुमची पावती रद्द होऊ शकते.

    हे वाचा-आता घरबरल्या Driving License मध्ये असा बदला Address, RTOमध्ये जाण्याचं No टेन्शन

    खरं तर शांतपणे गाडी चालवणं हेच महत्त्वाचं आहे. म्हणजे नकळतही नियमांचं उल्लंघन होणार नाही. वाहतुकीचे नियम आपल्या सुरक्षेसाठी बनवण्यात आले आहेत. ते पाळणं हे आपलं कर्तव्य आहे. सिग्नल तोडण्यासारख्या चुका करून चलान भरण्यापेक्षा काही सेकंद सिग्नलला थांबणं केव्हाही चांगलं. पण तुमची चूक नसताना ही चलान कापलं गेलं तर मात्र या गोष्टी नक्की लक्षात ठेवा.

    First published:

    Tags: Tech news, Technology, Traffic, Traffic police, Traffic Rules, Traffic signal