नवी दिल्ली, 2 नोव्हेंबर : सध्या फेस्टिव्ह सीजन सुरू असल्यानं ऑटोमोबाइल्स मार्केटमध्ये तेजी पाहायला मिळत आहे. जर दिवाळीनिमित्त (Diwali Shopping 2021) तुम्ही जर कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर कार घेताना SUV घ्यावी की hatchback? हा प्रश्न नक्कीच पडला असेल. सध्या भारतातील मार्केटमध्ये hatchback गाड्यांना मोठी मागणी आहे. Hatchback (hatchback automatic cars) गाड्यांबद्दल महत्त्वाच्या 5 गोष्टीं लक्षात ठेवाच. देशात सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमती लक्षात घेता आता लोक जास्त मायलेजच्या गाड्यांना प्राधान्य देत आहेत. परंतु Hatchback च्या गाड्यांचा विचार केला, तर भारतात मिळणाऱ्या सर्व गाड्यांचा मायलेज हा 20 किलोमीटर पेक्षा अधिक आहे. त्याचबरोबर सेडान किंवा SUV मध्ये मायलेज दर प्रतिकिलोमीटर 15 ते 20 एवढा आहे.
स्पेस स्टेशनमध्ये पिकली मिरची, अंतराळवीरांनी बनवली चवदार Dish; पाहा PHOTOs
शरांमध्ये पार्किंगची समस्या आहे. त्यावेळी साइजमध्ये कमी असल्यामुळे या गाडीला सहज पार्किंग करता येतं आणि ट्रॅफिकमधूनही या गाडीला लवकर बाहेर काढणं सोपं जातं. हॅचबॅक गाड्या छोट्या असल्यानं त्यांचा ग्राऊंड क्लियरंस परफेक्ट असतो. Maruti Baleno आणि Tata Tiago सारख्या कॉम्पॅक्ट हॅचबॅक गाड्यांचा ग्राऊंड क्लियरंस 170mm पर्यंत आहे.
फक्त 2.78 लाखांना मिळतेय Honda कंपनीची ही कार
त्याचबरोबर या कार्सची तुलना Hyundai i20 आणि Maruti Swift सोबत केली, तर या सर्व कार्सचा व्हिलबेस हा 2400mm पेक्षा जास्त आहे. हॅचबॅक कारगाड्यांमध्ये स्पेसची कमी असते अशी धारणा अनेक लोकांमध्ये आहे. त्यामुळं जर इतर गाड्यांशी तुलना केली तर हॅचबॅक कारगाड्यांमध्ये भरपूर जागा उपलब्ध असते.
फक्त 51 हजारांत मिळतेय Bajaj Avenger…पाहा काय आहे ऑफर
अनेक वेळा सेडान आणि SUV तील जास्त फीचर्समुळे अनेकांची या गाड्यांना पसंती असते. परंतु आता हॅचबॅक (upcoming hatchback cars in india) गाड्यांमध्ये सेफ्टी फीचर्स, मॅन्यूअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन, इन्फोटेनमेंट, पॉवर स्टेयरिंग सारखे फीचर्स देण्यात येत आहेत. त्यामुळे दिवाळीनिमित्त तुम्ही हॅचबॅक कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही एक चांगली संधी आहे.